ट्रॅफिकमुळे विलंब… केतकी माटेगांवकर लोकल ट्रेनने डोंबिवलीत
केतकी माटेगावकरने लोकलने गाठली डोंबिवली
‘भक्ती स्वरसंध्या’ला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ ः डोंबिवली एमआयडीसी, सुदर्शननगर येथे श्री दत्तजयंतीनिमित्त आयोजित ‘भक्ती स्वरसंध्या’ कार्यक्रमात अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर हिने रेल्वे लोकलने येत उपस्थिती लावली. गुरुवारी (ता. ४) सायंकाळी ६ ते १० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन आनंद पवार यांनी केले होते.
केतकी माटेगावकर नागपूर येथील कार्यक्रमावरून सकाळीच मुंबईला परत येण्याचे नियोजित होते; मात्र इंडिगो विमान कंपनीच्या संचलनातील घोळामुळे तिला मुंबईत पोहोचण्यास सायंकाळ झाली. त्यानंतर टॅक्सीने डोंबिवलीत पोहोचण्यासाठी तब्बल तीन तासांचा अवधी ट्रॅफिकमुळे दाखवल्याने तिने शेवटचा उपाय म्हणून लोकलचा मार्ग स्वीकारला.
लोकलने प्रवास करत ती रात्री ९ वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचली. दरम्यान, खास तिच्या गाण्यांसाठी मोठा श्रोतावर्ग संयमाने थांबून होता. मंचावर आल्यानंतर केतकीने तासभर अभंग आणि भक्तिगीते सादर करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाची सुरुवात गायक धनंजय म्हसकर यांच्या भक्तिगीतांनी झाली. तर अभिनेता विघ्नेश जोशी यांनी निवेदनाची जबाबदारी सांभाळत कार्यक्रमाची शोभा वाढवली. उशीर झाला तरी केतकी माटेगावकरने प्रेक्षकांना दिलेला मनमोहक सुरांचा नजराणा आणि आयोजकांनी दिलेली सुंदर भक्तिमय मैफल याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे मन:पूर्वक आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

