८५ लाखांचा ऑनलाईन गंडा
८५ लाखांचा ऑनलाइन गंडा
कासारवडवलीत गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : जास्त पैशांचे प्रलोभन दाखवत ऑनलाइन पैसे भरण्यास सांगून एका ५८ वर्षीय सेवानिवृत्त युनुस शेख यांना चार जणांनी ८५ लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना रोचित सिंग नामक व्यक्तीने फेसबुक मॅसेंजर ॲपवर दररोज ट्रेडिंगसाठी विनामूल्य शेअर्स मार्केट स्टॉकची माहिती देत एक लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक करण्यास सांगून त्यांना व्हीआयपी वन व्ही वन सर्विस टीम ८९७ या व्हॅट्सॲप ग्रुपवर जॉईन केले. त्यानंतर वान्या गिल हिने त्यांना अकाउंट ओपन करण्याकरिता प्ले स्टोअरमध्ये जाऊन इंड निव प्रो नावाचे अप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून ट्रेडिंग अप्लिकेशबद्दल माहिती दिली. तसेच जास्त पैशाचे प्रलोभन दाखवून सदर ॲपमध्ये ट्रेडिंगसाठी प्राप्त लिंक देऊन व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये वेगवेगळ्या बँकांचे खातेक्रमांक पाठवून त्याच्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. सदर ट्रेडिंग ॲपसाठी एकूण गुंतवणूक केलेली ८५ लाख ३८ हजार ४१३ अशी रक्कम परत न करता ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार २३ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबरदरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

