सदनिकाधारकांना कोट्यवधींचा गंडा

सदनिकाधारकांना कोट्यवधींचा गंडा

Published on

सदनिकाधारकांना कोट्यवधींचा गंडा
खारघर पोलिसांकडून तिघांवर गुन्हा दाखल
नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर): खारघरमधील अधिराज समयामा प्रकल्पात सदनिका घेणाऱ्या आठ जणांची सात कोटी २९ लाख ५७८ रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात तिघांविरोधात फसवणुकीसह अपहार तसेच महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल आहे.
तळोजा रोहिंजण येथील प्रकल्पातील ४३ व्या मजल्यावरील दोन सदनिका खेरदी केल्या होत्या. हप्ते, बँक कर्ज, ऑनलाइन ट्रान्स्फरद्वारे १.७६ कोटींपेक्षा अधिक रक्कम कंपनीकडे जमा केली, परंतु बांधकाम व्यावसायिकाने अद्याप सदनिकेचा ताबा दिलेला नाही. २०२२ मध्ये हप्ते भरल्यास नऊ टक्के वार्षिक व्याजाचा परतावा मिळेल, असे व्यावसायिक कंपनीकडून प्रलोभन दाखवण्यात आले. अनेकांनी या योजनेत पैसे गुंतवले आहेत, परंतु कंपनीने व्याज दिले, ना गुंतवणुकीची परतफेड केली आहे. त्यामुळे कोटवधींची फसवणूक झाली असल्याने खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मे. अधिराज कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकांविरोधात मंगळवारी (ता. २) महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियम १९९९- कलम ३, ४, भारतीय न्याय संहिता (बीएनस), २०२३ -कलम ३१८(४), ३१८(२), ३१६(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com