

बॉक्साईट उत्खननाला विरोध
श्रीवर्धनवासीय आक्रमक; गडबवाडीत भात, काजू पिकांचे नुकसान
श्रीवर्धन, ता. ९ (वार्ताहर) : तालुक्यातील गडबवाडी परिसरात सुरू असलेल्या बॉक्साईट उत्खननविरोधात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. बेसुमार उत्खननामुळे गावाचा पर्यावरणीय समतोल बिघडत असून, पाणीटंचाई, आरोग्याच्या समस्या आणि घरांवरील भूस्खलनाचा धोका वाढल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यामुळे गडबवाडी येथे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. बॉक्साईट उत्खननावरून ग्रामस्थ आणि पोलिसातही वाद झाल्याची घटना घडली आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील गडबवाडी गावालगत मागील काही महिन्यांपासून बॉक्साईट उत्खनन सुरू आहे. या उत्खननामुळे गावातील विहिरीतील झरे आटू लागले आहेत. पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. उत्खननस्थळी सातत्याने उडणाऱ्या धुळीमुळे श्वास घेणे कठीण झाले आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येत असल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे.
----------------------
गडबवाडी परिसर डोंगराळ असल्याने उत्खननादरम्यान सुरुंग लावले जातात. या स्फोटांच्या धक्क्यांमुळे गावातील अनेक घरांना भेगा पडत आहेत. परिसरातील गावातील घरे या धक्क्यामुळे कधीही कोसळण्याची शक्यता असल्याचेही नागरिकांनी सांगितले. उत्खननामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे गावकरी संतप्त झाले आहेत.
----------------------------
भातशेतीचे नुकसान
बॉक्साईट प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. सतत वाहतूक करणारे डम्पर यामुळे परिसरात पसरलेले धुळीचे साम्राज्य, प्रकल्पामुळे प्रदूषित झालेले जलस्रोत, परिसरातील रस्ते आणि पुलांची झालेली दुरवस्था, पारंपरिक भातशेती, विविध फळभाज्यांचे मळे आणि आंबा, काजू बागायतीवर झालेले दुष्परिणाम, असे अनेक प्रश्न नागरिक तसेच बागायतदार व शेतकरीवर्गाला भेडसावत आहेत.
-----------------------------
ग्रामस्थ व पोलिसात वाद
रस्त्यावर उतरलेल्या ग्रामस्थांच्या जमावाला मोर्चाचे स्वरूप आले होते. बाॅक्साईट उत्खनन थांबवावे या दृष्टीने रस्त्यावर आलेल्या ग्रामस्थांबाबत पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने स्थानिक व पोलिसात वाद निर्माण झाला.
---------------------------
श्रीवर्धन : फलक हाती घेत उत्खननाला विरोध करत डम्परमधून करण्यात येत असलेली वाहतूक रोखण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.