‘चौथ्या मुंबई’च्या उभारणीच्या दृष्टीने हालचाली सुरू
पालघर, ता. ९ ः मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा प्रमुख शहरांचा भार कमी करण्यासाठी तिसऱ्या मुंबईपाठोपाठ पालघरमध्ये ‘चौथ्या मुंबई’च्या उभारणीच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. पालघर, डहाणू किनारीपट्ट्यात ‘चौथी मुंबई’ विकसित केली जाणार असून वाढवण बंदर परिसर आणि परीघ त्याचा केंद्रबिंदू राहणार आहे. समृद्ध किनारपट्टी, तारापूर औद्योगिक पट्टा, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ, डीएफसी प्रकल्प, बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्ग, मच्छीमार बंदरे आदी पायाभूत सुविधा पाहता सरकारच्या विकास आराखड्यात पालघरला प्राधान्य दिले गेले आहे.
डहाणू तालुक्यातील ११, पालघरमधील २५, तर वसई, जव्हार आणि तलासरी तालुक्यातील इतर गावे मिळून १०७ गावांच्या परिसरात सुमारे ५५० चौरस किमी परिघात ‘चौथी मुंबई’ उभी राहणार आहे. शहराच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सुविधांयुक्त नियोजनबद्ध विकास आराखडा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत केला जात आहे. एमएमआर क्षेत्रात पायाभूत आणि इतर सुविधा उभारणीसाठी एमएमआरडीएमार्फत नियोजन केले जात आहे.
विशेष नियोजन प्राधिकरणही स्थापणार
जुलै २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेच्या अनुषंगाने एमएमआरडीएने पालघर जिल्ह्यातील २२४ वाढीव गावांचा समावेश एमएमआर अधिसूचित क्षेत्रामध्ये करण्यात आला आहे. यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून पालघरमधील विकास योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी नगररचना शाखेकडे सोपवण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील एमएमआर क्षेत्राच्या विकास आराखड्याच्या नियोजनाचे काम सुरू केले आहे. जमीन वापर नकाशा, अधिसूचित क्षेत्र सर्वेक्षण, तांत्रिक अभ्यास सुरू आहे.
पालघरला महत्त्व का?
- मुंबईला सर्वात जवळचा आणि विस्तारासाठी उपलब्ध विस्तीर्ण जमिनी
- तारापूर हे आशियातील मोठे औद्योगिक केंद्र
- समुद्रकिनारा, रेल्वे आणि महामार्ग यांची उपलब्धता
- बंदर, लॉजिस्टिक्स व आयटी पार्कसाठी योग्य वातावरण
चौथ्या मुंबईत काय असणार?
- आधुनिक उद्योग-गुंतवणूक कॉरिडॉर
- बहुमजली गृहनिर्माण प्रकल्प आणि नवी वसाहती
- डहाणू-विरार रेल्वे विस्तार, मेट्रो कनेक्टिव्हिटीचे नियोजन
- ग्रीन झोन व पर्यावरणपूरक नियोजन
- रोजगाराच्या मोठ्या संधी
- पाच पंचतारांकित हॉटेल्स प्रकल्प
- लॉजिस्टिक पार्क
- मनोरंजनाचे रिक्रिएशन ग्राऊंड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

