मुंबई
जयसाई क्रीडा मंडळात रक्तदान शिबिर
जय साई मंडळातर्फे रक्तदान शिबिर
घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) : जय साई क्रीडा मंडळाच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी (१४ डिसेंबर) सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी रक्तदात्यांचा सन्मान करण्यात येणार असून, त्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष यशवंत करंजे यांनी सांगितले.

