‘हिंदी साहित्यातील मूल्य चिंतन’चे माणगावमध्ये राष्ट्रीय परिषद
‘हिंदी साहित्यातील मूल्य चिंतन’चे माणगावमध्ये राष्ट्रीय परिषद
१३ डिसेंबरला नामवंत तज्ज्ञांची राहणार उपस्थिती
माणगाव, ता. १० (वार्ताहर) ः द. ग. तटकरे महाविद्यालय, माणगाव-रायगड येथे आधुनिक हिंदी साहित्याच्या प्रवाहातील मूल्यपरंपरा, सामाजिक परिवर्तन आणि नव्या आव्हानांचा वेध घेणारी राष्ट्रीय परिषद १३ डिसेंबर रोजी भरणार आहे. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (भारत सरकार), महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई आणि माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद होत असून, हिंदी साहित्य क्षेत्रातील अभ्यासकांसाठी हा एक महत्त्वपूर्ण बौद्धिक मेळावा ठरणार आहे.
परिषदेच्या उद्घाटन सत्राला डॉ. शीतला प्रसाद दुबे (माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी), प्रो. डॉ. अनिल सिंह (अधिष्ठाता, मानवविज्ञान विभाग, मुंबई विद्यापीठ) आणि प्रो. डॉ. संतोष मोटवानी (अध्यक्ष, हिंदी अध्ययन मंडळ, मुंबई विद्यापीठ) यांसारखे राष्ट्रीय ख्यातीचे विद्वान उपस्थित राहणार आहेत. तसेच माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, सचिव कृष्णा भाई गांधी यांच्यासह हिंदी विषयातील तज्ज्ञ प्रो. बाळासाहेब कोकाटे, प्रो. अनिल काळे, प्रो. सुभाष जाधव, प्रो. मोहसिन खान, प्रो. विद्या शिंदे, प्रो. सुभाष पवार, प्रो. ईश्वर पवार, प्रो. युवराज मुळे, डॉ. देवीदास बामणे, डॉ. के. के. शर्मा, डॉ. वंदन जाधव, प्रो. आर. गोपाळकृष्णन, डॉ. एस. ए. मंजुनाथ या मान्यवरांची उपस्थिती परिषदेचे वैचारिक पर्व अधिक समृद्ध करणार आहे. या परिषदेत देशभरातील अभ्यासक आणि संशोधक आधुनिक हिंदी साहित्याचे मूल्य बदल, सामाजिक वास्तवातील नव्या चाचण्या आणि साहित्यिक चिंतनाचे व्यापक पैलू यावर विचारमंथन करणार आहेत. नव्या पिढीसमोरील साहित्यिक आव्हानांना दिशा देणारा हा शैक्षणिक उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. बी. एम. खामकर, हिंदी साहित्य अकादमीचे सहसंचालक व सदस्य सचिव सचिन निंबाळकर, तसेच परिषद संयोजक व हिंदी विभागप्रमुख डॉ. जे. आर. पांडेय यांनी सर्व साहित्यप्रेमी, विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

