मुंबई
श्रमदानातून साकारला वनराई बंधारा
श्रमदानातून साकारला वनराई बंधारा
मोखाडा, ता. १० (बातमीदार) : येथील कारेगाव ग्रामपंचायतीमधील कोचाळे येथे ग्रुप ग्रामपंचायत कारेगाव, जि.प. शाळा कोचाळे, कृषी विभाग, कोचाळे ग्रामस्थ व राह फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोचाळे येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून काहीअंशी पाणीटंचाईलादेखील आळा बसणार आहे.

