काँक्रिटीकरण झाडांच्या मुळावर
काँक्रीटीकरण झाडांच्या मुळावर
पर्यावरणवाद्यांकडून महापालिकेवर नाराजी
नवी मुंबई, ता. १० ः नवी मुंबई महापालिकेतर्फे वाशीमध्ये रस्ते, पदपथ रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामामध्ये पदपथाच्या कडेला सुरू असलेले बांधकाम साहित्य झाडांवर टाकले जात आहे. त्यामुळे झाडे सूकून जाण्याची भीती पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.
वाशी सेक्टर २८ मधील प्रकल्पाची तयारी करण्यासाठी नागरी कर्मचारी तळाभोवती खोदकाम करीत आहेत. झाडांभोवती खोलवर खोदकाम सुरू असल्याचे लक्षात येताच त्यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. तर संचालक बी. एन. कुमार यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांना पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने रुंदीकरणाच्या कामांदरम्यान झाडांना इजा होणार नाही, याची खात्री करण्याची विनंती त्यांनी केली आहे. तसेच शहर अभियंता आणि उद्यान विभागाचे उपायुक्त यांना या समस्येकडे लक्ष देण्यास सांगितले.

