रबाळे एमआयडीसीत रस्ते-दुभाजकांची स्वच्छता

रबाळे एमआयडीसीत रस्ते-दुभाजकांची स्वच्छता

Published on

रबाळे एमआयडीसीत रस्ते- दुभाजकांची स्वच्छता
महापालिकेकडून धूळ नियंत्रणासाठी विशेष मोहीम
वाशी, ता. ११ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत नियमित स्वच्छतेसोबतच वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेतर्फे विशेष उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून घणसोली विभागातील रबाळे एमआयडीसी परिसरात रस्ते आणि दुभाजकांची सखोल स्वच्छता तसेच धूळ नियंत्रणासाठी व्यापक मोहीम शनिवारपासून हाती घेण्यात आली. वाढत्या औद्योगिक वाहतुकीमुळे या भागात धूळ साचण्याचे प्रमाण चिंताजनक बनले असून, त्यावर तोडगा म्हणून महापालिकेने यंत्रणेसह मानवी संसाधने मोठ्या प्रमाणावर तैनात केली आहेत.
या मोहिमेत मुख्य रस्त्यांवरील साचलेली माती व धूळ ब्रश मशीन आणि फ्लेपर मशीनच्या साहाय्याने संकलित करून १०० टक्के वाहून नेण्यात आली. त्यानंतर प्रक्रियाकृत पाण्याने रस्त्यांची धुलाई करून संपूर्ण परिसर निर्जंतुक व धुळीपासून मुक्त करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. वृषाली हॉटेल ते कल्पना हॉटेल या मुख्य मार्गावरील स्वच्छता मोहिमेसाठी तब्बल ३० स्वच्छताकर्मींचा चमू सक्रिय होता. यासोबतच एनकॅप वाहनाद्वारे हवेत कारंजासारखे पाण्याचे फवारे मारून धूळ कमी करण्याचे तांत्रिक कार्यही करण्यात आले. रबाळे येथील सिद्धार्थनगर ते फायबर कंपनीदरम्यानही अशीच सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या ठिकाणी रस्त्यांवरील माती, दगड तसेच रस्त्याच्या कडेला पडलेला बांधकाम व पाडकामाचा राडारोडा उचलून टाकण्यात आला. औद्योगिक क्षेत्रात सुरक्षित व स्वच्छ वातावरण तयार करण्यासाठी ही कारवाई उपयुक्त ठरत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
................
स्‍वच्‍छता पथके तैनात
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी २५ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली विभागनिहाय पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून दैनंदिन स्वच्छतेसोबतच वायू प्रदूषण नियंत्रणासाठी अशा प्रकारच्या सखोल स्वच्छता मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com