कोर्तोबा यात्रेत संस्कृतीचा ठसा
कोर्तोबा यात्रेत संस्कृतीचा ठसा
शेकडो वर्षांची परंपरा, भाविकांची मांदियाळी
जव्हार, ता. १३ (बातमीदार)ः तालुक्यातील कोर्तोबा उत्सव शनिवारपासून सुरू झाला. या महोत्सवात आदिवासी संस्कृतीचा ठसा उमटवत हजारो भाविकांनी शेकडो वर्षांची परंपरा जपली. उत्सवकाळातील क्रिकेटची स्पर्धांबरोबर कुस्त्यांचे दंगल आकर्षणाचे केंद्र राहिले.
कोरतड गावातील पाहणीसाठी हजारोच्या संख्येने भाविक आले होते. फळे, फुले, नारळ, अगरबत्ती, प्रसाद अशा दुकानांसोबतच कपडे, खेळणी, खाऊ, कानातले-नाकातले दागिने, फुगे, उसांचे गाडे तसेच विविध खाद्यपदार्थांच्या दुकानांनी यात्रेची शोभा वाढवली होती. क्रिकेट स्पर्धा या उत्सवाचे आकर्षण राहिले. कायरी क्रिकेट संघाने प्रथम तर बांबरेपाडा, चिरेचापाडा क्रिकेट संघ अनुक्रमे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी राहिले, तर पालघर, मोखाडा, विक्रमगड, जव्हार, भिवंडी, मालेगाव, नाशिक औरंगाबाद, मुरबाड, कल्याण, त्र्यंबकेश्वर, वसई-विरार येथील कुस्तीवीरांच्या दंगलीत चुरशीचे सामने झाले. या स्पर्धेत मोखाड्याचा ज्ञानेश्वर माळी, धुळे येथील विशाल चौधरीने पुरस्कार पटकावले.
-------------------------------------
मान्यवरांची हजेरी
विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते उत्सवाचे उद्घाटन झाले, तर माजी आमदार सुनील भुसारा, कार्यक्रमाध्यक्ष संदीप माळी, माजी सभापती दिलीप पाडवी, शोहेब लुलानिया सामाजिक कार्यकर्ते, मंडळ व्यवस्थापक भरत गोविंद उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

