वाहनांसाठी एक दिशा मार्ग

वाहनांसाठी एक दिशा मार्ग

Published on

वाहनांसाठी एक दिशा मार्ग
दहिसर टोलनाक्यावरील कोंडीवर उतारा
भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरातून येणाऱ्या रस्त्यांसाठी एक दिशा मार्गाच्या अंमलबजावणीचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या निर्णयामुळे दहिसर टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीतून चालकांना काहीअंशी दिलासा मिळणार आहे.
दहिसर टोलनाक्याजवळ सकाळच्या गर्दीच्या वेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकांवर, सायंकाळी मुंबईहून काशीमिरा नाक्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते. या कोंडीवर काही दिवसांपूर्वी टोलनाका सुमारे शंभर मीटर काशीमिरा नाक्याच्या दिशेने स्थलांतरित करण्यात आला आहे; मात्र त्यानंतरही परिस्थितीत काही फरक पडलेला नाही. सध्या सायंकाळच्या वेळी मुंबईहून काशीमिरा नाक्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. परिणामी, वाहतूक कोंडीत भर पडली आहे.
़़़़़़़़़़़़़़़ः-------------------------
अधिसूचना लागू
पेणकर पाडा, अजित पॅलेस हॉटेल नाका, पांडुरंगवाडी, मिरा-गावठाण, अमर पॅलेस हॉटेल नाका येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना सायंकाळी ६ ते रात्री १० दरम्यान येणारी सर्व वाहने डावे वळण घेऊन सेवा रस्त्याने अमर पॅलेस हॉटेल नाक्याच्या दिशेने जातील. मिरा-रोडच्या सृष्टी परिसरातून पाच मार्गांवर जाण्यास प्रवेशबंदी आहे. १५ ते २२ डिसेंबर कालावधीसाठी अधिसूचना प्रायोगिक तत्त्वावर आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com