वागळेतून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

वागळेतून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

Published on

वागळे इस्टेटमधून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ठाणे शहरात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. वागळे इस्टेट परिसरात राहणाऱ्या ११ आणि १४ वर्षीय दोन अल्पवयीन मुली शाळेतून घरी परतल्या नाहीत. यामुळे ठाणे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दोन्ही मुली गुरुवारी (ता. ११) सकाळी साडेसहा वाजता नेहमीप्रमाणे इंदिरानगर येथील शाळेत गेल्या होत्या; मात्र दुपारी शाळा सुटल्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. पालकांनी शाळेत आणि नातेवाइकांकडे चौकशी केल्यानंतर त्या सापडल्या नाहीत. कोणीतरी त्यांना कायदेशीर रखवालीतून फुस लावून पळवून नेले असल्याची तक्रार श्रीनगर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com