कोलाडच्या शाळेत ‘गुड टच–बॅड टच’ जनजागृती

कोलाडच्या शाळेत ‘गुड टच–बॅड टच’ जनजागृती

Published on

कोलाडच्या शाळेत ‘गुड टच-बॅड टच’ जनजागृती
रोहा, ता. १३ (बातमीदार) : राज्यात बलात्कार, लहान मुलांवरील लैंगिक शोषण व अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्राथमिक आदर्श (केंद्र) शाळा, कोलाड येथे शुक्रवारी (ता. १२) ‘गुड टच-बॅड टच’ मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श यातील फरक समजावून सांगत स्वतःच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड व रायगड जिल्हाध्यक्ष वैभव हरिश्चंद्र सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक धामणसे व रोहा तालुका संघटक आत्माराम दिवेकर यांच्या नियंत्रणाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम दामिनी पथक, महाराष्ट्र पोलिस यांच्या विशेष सहकार्याने घेण्यात आला. या वेळी दामिनी पथकाच्या हवालदार वैशाली कोंजे, महिला पोलिस शिपाई श्रावणी भोईर, रील स्टार कोमल गायकवाड, साधना साटम, अक्षय गायकवाड उपस्थित होते. मुख्याध्यापिका सीमा कळमकर व शिक्षकांनी कार्यक्रमाचे स्वागत केले.

Marathi News Esakal
www.esakal.com