उमेदवारांना एकनिष्ठतेची शपथ

उमेदवारांना एकनिष्ठतेची शपथ

Published on

उमेदवारांना एकनिष्ठतेची शपथ
मिरा-भाईंदरमध्ये भाजपवर वेळ, बंडखोरी टाळण्यासाठी शक्कल
भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. मिरा-भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी साडेतीनशे अर्ज आल्याने बंडखोरीची भीती आहे. त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही तरी पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याची शपथ उमेदवारांना दिली जात आहे.
आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता, जिल्हाध्यक्ष दिलीप जैन, माजी उपमहापौर हसमुख गेहलोत यांचा मुलाखत घेणाऱ्यामध्ये समावेश आहे. महापालिकेच्या ९५ जागांसाठी आतापर्यंत ३६० इच्छुकांनी पक्षाकडे मुलाखत दिली आहे. मुलाखतीमध्ये उमेदवाराची राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी, निवडून येण्याची क्षमता तसे निवडणुकीसाठी खर्च करण्याची क्षमता बाबी तपासल्या जात आहेत. तसेच मुलाखतीनंतर प्रत्येकाला शपथ घेण्यास सांगितले जात आहे.
---------------------------
मी शपथ घेतो की...
पक्षाच्या विचारधारेला मानणारे असून पक्षाशी एकनिष्ठ असून उमेदवारी मिळाली नाही तरीदेखील निवडणुकीत पक्षासाठीच काम करू, तसे केल्यास आपण पक्षाशी बेईमान आहोत, अशी शपथ इच्छुकांना घ्यावी लागत असून त्याचे चित्रीकरणदेखील केले जात आहे.
----------------------------
अर्ज मागे घेण्याचे आवाहन
- महापालिका निवडणुकीत ९५ पैकी भाजपने ६१ जागा निवडून आणून एकहाती सत्ता स्थापन केली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले आहे. त्यातच भाजपला नुकत्याच बिहारमध्ये मिळालेल्या घवघवीत यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.
- चार सदस्यीय प्रभागात भाजपकडून सात ते आठ जण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून शपथ वदवून घेतली जात आहे. तर निवडून येण्याची शक्यता नसलेल्या काही इच्छुकांकडून मुलाखत अर्जही मागे घेण्याचे आवाहन पक्षाकडून केले जात आहे.
-------------------------------
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेताना लेखी शपथ घेतली जात होती. त्याचे चित्रीकरण केले जात आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहावे, हीच यामागची अपेक्षा आहे.
- दिलीप जैन, जिल्हाध्यक्ष, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com