रब्बी हंगामात विक्रमगड तालुक्यात गवार लागडीचे क्षेत्र वाढले
रोजगारासाठीच्या भटकंतीला पूर्णविराम
विक्रमगड तालुक्यात गवार लागडीतून भरघोस उत्पन्न
विक्रमगड, ता. १६ (बातमीदार)ः तालुक्यातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगामात गवार लागवडीकडे कल वाढला आहे. गेल्या वर्षी गवारला मिळालेल्या चांगल्या बाजारभावाबरोबर कमी खर्च, स्थिर बाजारपेठ आणि जलद उत्पादन रोजगारासाठी भटकणाऱ्या नव शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न दिले आहे.
गवार लागवडीच्या वाढीमागे आर्थिक कारणांबरोबरच नैसर्गिक घटकांचाही महत्त्वाचा वाटा आहे. या भागात कमी पाण्यात चांगले वाढणारे गवार पीक मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरत आहे. विक्रमगड तालुक्यातील मातीची रचना, उपलब्ध वातावरणीय परिस्थिती गवार पिकासाठी अनुकूल असल्याने या पिकाचे क्षेत्र सातत्याने वाढत चालले आहे. परंपरागत पिकांच्या तुलनेत कमी जोखमीचे आणि चांगले दर देणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्याचे साधन ठरत आहे. विशेष म्हणजे, येथे पिकवले जाणारे गवार रासायनिक खतांचा वापर करून तयार केली जाते. यामुळे त्याची चव आणि गुणवत्ता उच्च दर्जाची राहते. त्यामुळे कल्याण, मुंबईबरोबर आता गुजरातमधूनही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
-----------------------------
विक्रमगड तालुक्यातील गवार लागवड, तणनियंत्रण, तोडणी, वर्गीकरणस वाहतूक टप्प्यांमध्ये भरपूर मजुरांची गरज असल्याने स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत आहे. ही रोजगारनिर्मिती आदिवासीबहुल विक्रमगड तालुक्यातील स्थलांतर रोखण्यास महत्त्वाची ठरत आहे. पूर्वी रोजगाराच्या शोधात बाहेर जाणारे अनेक मजूर आता गावीच भाजीपाला शेती करू लागल्याने स्थानिक पातळीवरच स्थिर झाले आहेत. भाजीपाला उत्पादकतेतून निर्माण झालेला रोजगार या सर्व घटकांमुळे तालुक्यातील ग्रामीण रोजगारनिर्मितीला नवे बळ मिळत आहे.
-------------------------
काही वर्षांपासून गवार लागडवडीतून चांगला नफा मिळत आहे. गेल्या वर्षी भाव चांगला मिळाल्यामुळे यंदा जास्त प्रमाणात गवार लावली आहे. यावर्षी सुरुवातीला भावही चांगला मिळत आहे.
-रमण कोरडा, शेतकरी, करसुड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

