जोगेश्वरी मॅरेथॉन २०२५ स्पर्धा येत्या रविवारी
‘जोगेश्वरी मॅरेथॉन’ २१ डिसेंबरला
मुंबई, ता. १७ : दरवर्षीप्रमाणे यंदाही राजे शिवाजी स्पोर्टस क्लबतर्फे जोगेश्वरी-अंधेरी विधानसभा क्षेत्रातील मुला-मुलींसाठी मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन केले आहे. यंदा ‘जोगेश्वरी मॅरेथाॅन २०२५’ रविवारी (ता. २१) होणार आहे. एल. एम. पार्क (मीनाताई ठाकरे उद्यान), पूनम नगर, अंधेरी-जोगेश्वरी (पूर्व) या ठिकाणी सकाळी साडेसहा वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
१० ते १२ वयोगटासाठी एक किलोमीटर, तसेच १४ ते १६ वयोगटासाठी तीन ते पाच किलोमीटर अंतर असे स्पर्धेचे स्वरूप आहे. वेगवेगळ्या वयोगटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या वेळी खासदार रवींद्र वायकर, आमदार अनंत (बाळा) नर, अमोल कीर्तिकर (युवा सेना सरचिटणीस,), माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक, शिवानी शैलेश परब, प्रविण गजानन शिंदे, शैलेश परब (भा. का. चिटणीस), भालचंद्र अंबुरे आणि स्नेहा निखिल शिंदे आदी मान्यवर मंडळी या वेळी उपस्थित राहणार आहेत. मॅरेथॉनचे स्पर्धेचे आयोजन पांडुरंग सातवसे, सचिन चिटणीस, राजेंद्र सातवसे, हेमंत पाटणकर, सतीश सिंह, रंजन चौहान, भावेश सावंत, दिपेश वाळके आदींनी केले आहे.

