

आकाश पाटील यांची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड
रोहा ता.१६ ( बातमीदार )
बीड येथे होणाऱ्या ६१ व्या राज्यस्तरीय पुरुष गट खो-खो अजिंक्यपद स्पर्धेसाठी रायगड जिल्हा पुरुष गट खो-खो संघात एस.एन.एस.स्पोर्ट्स रोहा पुरस्कृत ओम साई राम (सानेगाव) संघाचा खेळाडू कु. आकाश पाटील याची निवड करण्यात आली आहे. आकाशने जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत उत्तम कामगिरी करत हे यश मिळविले आहे.
त्याच्या या यशामध्ये त्याचे प्रशिक्षक व संघातील इतर खेळाडू यांचा सिंहाचा वाटा आहे. एस.एन.एस. स्पोर्ट्सचे अध्यक्ष अमर सलागरे यांनी त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.तर आकाशच्या या निवडीबद्दल सानेगाव गावासह संपूर्ण रोहा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.
...............
खा.सुनिल तटकरे यांच्याहस्ते चिंचवली तर्फे दिवाळी ग्रा.पं.इमरात कार्यालयाचे भूमिपूजनरोहा ता.१६ (बातमीदार) बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत रोहे तालुक्यातील चिंचवली तर्फे दिवाळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामाचे भूमीपूजन खासदार सुनिल तटकरे यांच्याहस्ते पार पडला.या कामाच्या माध्यमातून स्थानिक ग्रामस्थांच्या सेवेसाठी नवीन सुसज्य ग्रामपंचायत कार्यालय उपलब्ध होणार असून ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत कामांना देखील गती मिळणार असा विश्वास खा.सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. चिंचवली येथे शनिवारी ( ता. १३ ) रोजी पार पडलेल्या या कार्यक्रम प्रसंगी युवा नेते राकेश शिंदे, रोहा ता.राष्ट्रवादी काँग्रेस महिला विभाग अध्यक्षा प्रितमताई पाटील,जेष्ठ नेते नारायण धनवी,रामचंद्र चितळकर, गडकिल्ले प्रेमी श्री. शेलार,नरेंद्र जाधव, मनोज शिर्के, दर्शन तेलंगे,संजय मांडळुस्कर,राकेश कापसे,विजय कामथेकर,राजाराम येरुणकर,पांडुरंग भोनकर, चिंचवली अध्यक्ष बबन येरुणकर, उपाध्यक्ष राजेंद्र भिलारे, मारुती रामा मालुसरे,संतोष निकम, अजय निकम,प्रमोद तेलंगे,ग्रामपंचायत आजी माजी सदस्य,तसेच हेटवणे,चिंचवली,बौद्धवाडी, आदिवासी वाडी,असंख्य ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.