निष्पक्ष निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज
निष्पक्ष निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज
पनवेलमध्ये साडेचार हजार कर्मचारी, ३६ भरारी पथके तैनात
पनवेल, ता. १८ (बातमीदार)ः महापालिकेच्या निवडणुका निष्पक्ष होण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने तब्बल साडेचार हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असून शहरात ३६ भरारी पथके तैनात केली जाणार आहेत.
मतदान केंद्रावरील सोयीसुविधा, स्ट्राँग रूम, मतमोजणी केंद्राबाबतच्या तयारीची माहिती पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी गुरुवारी (ता. १८) पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे उपस्थित होते. निष्पक्ष निवडणुकांसाठी कर्मचारी नियुक्ती, कक्षाची स्थापना, वेगवेगळ्या पथकाची स्थापना करणे, अशी कामे अधिक प्राधान्याने केली जात आहेत. यासोबत यंदाच्या निवडणुकीत मतदान कसे वाढवायचे, याचेही प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी जनजागृतीपर उपक्रम घेतले जाणार आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या अनुषंगाने शहरातील प्रत्येक तीन प्रभागांसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी, दोन सहाय्यक अधिकारी नेमले आहेत.
---------------------------
नेमलेली पथके
निवडणूक निर्णय अधिकारी - ६
भरारी पथके - ३६
स्थिर सर्वेक्षण पथके - ३६
व्हिडिओ पाहणी पथके - १२
व्हिडिओ चित्रीकरण पथके - २
-----------------------------
विविध कक्ष
कर्मचारी नेमणूक, व्यवस्थापन कक्ष, प्रशिक्षण, ईव्हीएम व्यवस्थापन, मतदान केंद्र निश्चिती, सोयीसुविधा, स्ट्राँग रूम, मतमोजणी केंद्र व्यवस्थापन कक्ष, नाहरकत बेबाकी प्रमाणपत्र कक्ष, छपाई साहित्य वितरण, जनजागृती कक्ष, माहिती कक्ष, विद्रुपीकरण कायद्यान्वये कार्यवाही कक्ष, दूरसंचार सुविधा, एक खिडकी, आचारसंहिता, विधी, निवडणूक खर्च, पर्यवेक्षण, वाहतूक व्यवस्थापन, विद्युत व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन कक्ष, आरोग्य, नोडल ऑफिसर, साहित्य समन्वय, निवडणूक समन्वय, नियंत्रण अधिकारी कक्ष आहेत.
-------------------
मतदार संख्या
पुरुष - २ लाख ९४ हजार ८२१
स्त्री - २ लाख ६९ हजार ६८५
तृतीयपंथी - ७२
एकूण मतदार - ५ लाख ५४ हजार ५७८
-------------------------------
पनवेल पालिका सार्वत्रिक निवडणुकासाठी प्रशासन सज्ज आहे. या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी गाठण्याचा आमचा प्रयत्न असून, निर्विघ्नपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
- मंगेश चितळे, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

