पान ३ पट्टा
शेतकरी समस्यांवर बैठकीतून तोडगा
जव्हार (बातमीदार)ः ठाणे-पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या धान्य खरेदीतील अडचणी, दर, नोंदणी प्रक्रिया तसेच प्रत्यक्ष खरेदीदरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जव्हार येथे आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने शुक्रवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला महामंडळाचे संचालक सुनील भुसारा, दिलीप पटेकर उपस्थित होते. या बैठकीत शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करताना येणाऱ्या अडचणी, हमीभाव वेळेत न मिळणे, कागदपत्रांची गुंतागुंत, केंद्रांवर मनुष्यबळाचा अभाव, वाहतूक खर्च तसेच खरेदी केंद्रांची अपुरी संख्येबाबत सविस्तर चर्चा केली. आदिवासी पट्ट्यातील शेतकऱ्यांना धान्य विक्रीसाठी दूरवर जावे लागत असल्याने, आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
ः----------------------------------------
वीटभट्टीवरील मजुरांची आरोग्य तपासणी
पालघर (बातमीदार)ः जिल्ह्यातील वीटभट्टी, बांधकाम क्षेत्रात कार्यरत स्थलांतरित कामगारांसोबत कुटुंबीयांच्या आरोग्य सुरक्षेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा प्रशासन आरोग्य व महिला बालविकास विभाग महसूल विभाग यांच्या समन्वयातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत तिसऱ्या गुरुवारी नियमित आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पालघर तालुक्यातील चहाडे, कोकणेर येथील वीटभट्टी परिसराला जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) अतुल पारसकर यांनी भेट देऊन स्थलांतरित लाभार्थ्यांच्या आरोग्य सेवांची प्रत्यक्ष पाहणी केली.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ः-----------------------------
विक्रमगडची मुले क्रीडास्पर्धेत चमकली
विक्रमगड (बातमीदार)ः विक्रमगड केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा यशवंतनगर मैदानावर उत्साहात झाला. लंगडी, खोखो, कबड्डी, धावणे, रिले, लांब उडी, संगीतखुर्ची, बुद्धिबळ खेळात विद्यार्थ्यांनी कौशल्य दाखवले. खोखो-सुकसाळे, कबड्डी- सवादे, लंगडी - सवादे (मुले) व गुरवपाडा (मुली), रिले -सवादे (मुले) विक्रमगड (मुली) या जिल्हा परिषद शाळा संघांनी बाजी मारली. अविनाश पवार (विक्रमगड) प्रथम, रोशन धोदाड (गुरवपाडा) द्वितीय, सोनाक्षी दांगटे ( यशवंतनगर)प्रथम, सानिया वाघ (माण) द्वितीय क्रमांक मिळवला. लांब उडीत मोहित भिमरा (सवादे) व प्रगती दुधेडा (यशवंतनगर) यांनी प्रथम क्रमांक मिळवले. स्पर्धेचे केंद्रस्तरावर नियोजन केंद्रप्रमुख निवास ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
़ः----------------------------
श्रमदानातून बांधला वनराई बंधारा
वाडा (बातमीदार)ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रमांतर्गत गोऱ्हे ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता ग्रामस्थांच्या लोकसहभागातून करत स्वच्छतेचा नवामंत्र दिला गेला. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या संकल्पनेतून नदीत मातीचे वनराई बंधारे नरेंद्र महाराज संप्रदाय, लोकसहभागातून बांधण्यात आला. गोऱ्हे येथील नाल्यावर महिलांनी बांधला. या बंधाऱ्यामुळे पावसाचे वाया जाणारे हजारो लिटर पाणी भूगर्भात जिरवण्यास मदत होते. या बंधाऱ्यात साठलेले पाणी वन्यजीव गुरांना पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनवराई बंधारे उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर नदी परिसरातील मातीची होणारी धूप थांबणार आहे. विहीर, तलावांची पाण्याची पातळी वाढणार आहे.
़़ः--------------------------------
फ्रेंकलिन सेरेजो यांची निवड
विरार (बातमीदार)ः वसईमधील वेलंकिनी को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष ताठ कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघाचे संचालक यांची कोकण विभाग नागरी सहकारी संघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्या., अलिबाग या संस्थेच्या स्थापनेपासून फ्रेंकलिन सेरेजो संचालक म्हणून काम करत आहेत. २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीठी संचालक म्हणून निवडून आले आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये आपल्या कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघातील तत्कालिन उपाध्यक्षांनी पद, संचालक पदाचा राजीनामा दिल्यामुळे संघावरील उपाध्यक्षपदाच्या रिक्त जागी फ्रेंकलिन सेरेजो यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती २०२७ पर्यंत असणार आहे.

