मतदान केंद्रांना छावणीचे स्वरूप
मतदान केंद्रांना छावणीचे स्वरूप
पालघर नगर परिषदेसाठी आज मतमोजणी
पालघर, ता. २० (बातमीदार) : पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पोलिस, नगर परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. १५ प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू होणार असून, सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यानिमित्ताने परिसराला छावणीचे रूप आले आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली १४ पोलिस अधिकारी आणि १०० पोलिस, एक आरसीपी, स्ट्राइ किंग आणि एसआरपीची तुकडी मतमोजणी केंद्रावर तैनात राहणार आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी मतमोजणी केंद्राच्या परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. उमेदवार किंवा त्यांच्या एका अधिकृत प्रतिनिधीला केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच संपूर्ण मोजणी प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. या वेळी सर्व प्रक्रिया पारदर्शक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने मतमोजणी केंद्राकडे जाणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच केंद्रातील निकालासाठी घोषणा प्रणाली लावली असल्याचे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत जाधव यांनी सांगितले.
---------------------------------
१०० कर्मचाऱ्यांचे पथक
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी होणार आहे. एकूण सहा फेऱ्यांमध्ये १५ टेबलद्वारे मतमोजणी होणार असून, मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक, ऑफिसर, टॅब्युलेशन टीम, संगणक टीम, ईव्हीएम स्ट्राँग रूम टीम, शिपाई अशी १०० कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत राहणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
----------------------------
चुरशीची लढत
पालघर नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. भाजपचे उमेदवार कैलास म्हात्रे, शिंदे शिवसेना गटाचे उत्तम घरत यांच्यामध्ये खरी लढत होणार आहे. नगराध्यक्षपदी निवडून येणारा उमेदवार ५०० ते १,००० मतांच्या आघाडीने निवडून येण्याची शक्यता आहे. नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात सहा उमेदवार आहेत. त्यामुळे मतमोजणीनंतर कमळ फुलेल की धनुष्यातून बाण सुटला, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

