नाताळ-नववर्षासाठी विक्रमगड तालुक्यातील कृषि पर्यटन केंद्रे व फार्म हाऊस सज्ज

नाताळ-नववर्षासाठी विक्रमगड तालुक्यातील कृषि पर्यटन केंद्रे व फार्म हाऊस सज्ज

Published on

नाताळ-नववर्षासाठी विक्रमगडचे फार्महाउस, कृषी केंद्रे ‘हाउसफुल्ल’
शहरी पर्यटकांची निसर्गाच्या सान्निध्याला पसंती; स्थानिक रोजगारात वाढ
विक्रमगड, ता. २४ (बातमीदार) : निसर्गसंपन्न वनराई आणि प्रदूषणमुक्त वातावरणासाठी ओळखला जाणारा विक्रमगड तालुका नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. मुंबई, ठाणे, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली यांसारख्या शहरांतून पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर बुकिंग केल्यामुळे तालुक्यातील बहुतांश कृषी पर्यटन केंद्रे आणि फार्महाउस सध्या ‘हाउसफुल्ल’ झाली आहेत.
विक्रमगड तालुक्यात सध्या सहा ते सात कृषी पर्यटन केंद्रे, ३०च्या आसपास फार्महाउस आणि प्रमुख हॉटेल्स पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. शहरातील धकाधकीपासून दूर राहण्यासाठी अनेक पर्यटकांनी निसर्गाच्या कुशीत राहण्याला पसंती दिली आहे. शेकोटी, स्थानिक ग्रामीण खाद्यपदार्थ, जंगल सफारी आणि ट्रेकिंग यासोबतच यंदा हॉटेलमधील खोल्यांपेक्षा ‘टेन्ट स्टे’ला पर्यटकांकडून विशेष मागणी होत आहे. नाताळच्या पार्श्वभूमीवर सर्व पर्यटन केंद्रांवर आकर्षक विद्युत रोषणाई आणि संगीत-मनोरंजनाचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दरम्‍यान, ‘‘ऐनवेळी खोल्या मिळणे कठीण असल्याने पर्यटकांनी आधीच आरक्षणे केली आहेत. ग्रामीण जीवन आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी यंदा पर्यटकांचा ओघ अधिक आहे,’’ अशी माहिती विक्रमगडमधील कृषी पर्यटन केंद्रचालकांनी दिली.

स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ
पर्यटनाच्या या हंगामामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी आणि सेवा पुरवठादारांच्या व्यवसायालाही यामुळे मोठी चालना मिळत असून, पर्यटन व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com