जव्हारचे ‘कारभारी’ नव्या दमाचे
जव्हारचे ‘कारभारी’ नव्या दमाचे
नगर परिषदेत भाजपचे एकहाती वर्चस्व
जव्हार, ता. २४ (बातमीदार)ः जव्हार नगर परिषदेत माजी आमदार सुनील भुसारा, शिवसेनेचे उपनेते नीलेश सांबरे यांच्या विजयाची गणिते फोल ठरवत भाजपने एकहाती सत्ता आणली आहे. नगराध्यक्षपदाह १६ सदस्यांना निवडून आणताना मतदारांना नवख्या उमेदवारांवर विश्वास टाकला आहे.
अटीतटीची ठरलेली जव्हार नगर परिषदेची निवडणूक चांगलीच गाजली आहे. या निवडणुकीत मतदारांनी १६ नवख्यांना नगर परिषदेत पाठविले आहे, तर चार माजी नगरसेवकही परत एकदा नगर परिषदेत परतले आहेत. यामुळे नगर परिषदेत नवे चेहरे यंदा जास्त प्रमाणात दिसणार आहेत. माजी नगरसेवकांना प्रवेश मिळाला असला तरी काही दिग्गजांना मात्र धक्का बसला आहे.
---------------------------
दिग्गजांना दणका
या निवडणुकीत बहुतांश माजी नगरसेवकांनी परत रिंगणात उडी घेतली असतानाच नवख्या चेहऱ्यांचाही भरणा दिसला. यामध्ये काही तर अगदीच नवखे होते. यावेळी काही माजी नगरसेवकांना आरक्षणाचा धक्का बसल्याने त्यांनी पत्नीला रिंगणात उतरविले होते. मात्र, मतदारांनी मतमोजणीत १६ नवख्या उमेदवारांना नगर परिषदेत पाठवताना दिग्गजांना दणका दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

