उंबर्डे येथे हरिनाम सप्ताह

उंबर्डे येथे हरिनाम सप्ताह

Published on

उंबर्डे येथे हरिनाम सप्ताह
पेण ता. २४ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील उंबर्डे ग्रामस्थांच्या वतीने ह.भ.प. बन्सीलाल बाबा महाराज यांच्या प्रेरणेने शुक्रवार, २६ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता ज्ञानेश्वर माउलींच्या दिंडी सोहळ्याने, ध्वजारोहण व वीणा पूजनाने सप्ताहाची सुरुवात होणार आहे. दररोज पहाटे ५ वाजता काकडा, त्यानंतर ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी ५ वाजता प्रवचन, ६ वाजता हरिपाठ व रात्री ९ वाजता कीर्तन, असे कार्यक्रम असतील.
२६ डिसेंबर रोजी सायंकाळी ह.भ.प. रमाकांत महाराज (कोपरोली) यांचे प्रवचन, वैकुंठवासी ह.भ.प. बन्सीलाल महाराज (उंबर्डे) यांचा हरिपाठ व ह.भ.प. बालाजी महाराज मोहिते (बीड) यांचे कीर्तन होईल. २७ डिसेंबर रोजी ह.भ.प. दिनेश महाराज (डोलवी) यांचे प्रवचन व ह.भ.प. अभिजित महाराज गिरी (काकडवाडी) यांचे कीर्तन होणार आहे. रविवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प. संत यशवंत महाराज (पुणे) यांचे कीर्तन होईल. त्यांना मृदंग साथ ह.भ.प. सागर महाराज (आळंदी) देतील.

Marathi News Esakal
www.esakal.com