नाताळसाठी घरगुती केकला वाढती मागणी

नाताळसाठी घरगुती केकला वाढती मागणी

Published on

नाताळसाठी घरगुती केकला वाढती मागणी
किमतीमध्ये १० ते १५ टक्‍के वाढ
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः नाताळ अर्थातच येशू ख्रिस्तांचा जन्मदिन साजरा करण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे. अनेक जण केक कापून हा सण साजरा करतात. या पार्श्वभूमीवर मुंबईतील केकच्या दुकानांमध्ये विक्रीकरीता केक दाखल झाले आहेत. यंदा केकच्या किमतीत १० ते १५ टक्के एवढी वाढ झाली आहे. त्यामुळे घरगुती केकला मागणी वाढली आहे.
नाताळच्या दिवशी ख्रिस्ती समाज चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देताना केक खाऊ घालतात. त्यामुळे सर्वत्र केकला मागणी वाढली आहे. या सणानिमित्त बाजारात ट्रफल, रेड वेलवेट, स्टारबक्स, थेओब्रोम, ब्लॅक फॉरेस्ट, चॉकलेट ब्लॅक फॉरेस्ट, बटर स्कॉच, व्हॅनिला, ख्रिसमस ट्री, स्नोमॅन, सांता क्लॉजसह प्लम केकची अधिक चलती आहे. या केकच्या किमती ४०० ते २,००० च्या घरात आहेत. केक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य महागल्यामुळे केकच्या किमतीत वाढ झाली आहे. सामान्य ग्राहकांच्या खिशावर त्याचा फटका बसला आहे.

थीमचे केक
अलीकडे वेगवेगळ्या थीम व डिझाइन्सच्या केकला जास्त मागणी आहे. अनेक ग्राहक आपल्या आवडी-निवडीप्रमाणे, घरगुती, ऑनलाइन तसेच विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या केक ऑर्डर करण्याकडे आपला आपला मोर्चा वळवला आहे.

केकला लागणारे साहित्य महागले आहे. त्यामुळे केकच्या किमती वाढवाव्या लागल्या आहेत. डिझाइननुसार आम्ही केकची किंमत आकारतो.
- प्रकाश खर्डे, मालक-द केक हाउस

घरघुती बेकरकडे ब्रँडेड केकच्या तुलनेत स्वस्त असतात. त्यामुळे मी या वेळी घरगुती बेकरकडून केक आणणार आहे.
- हेलन दानते, ग्राहक

मनुका केक कापून नाताळ साजरा करण्याची मोठी परंपरा आहे. या वेळीदेखील घरी मनुका केक तयार करणार आहे, बाहेरूनही विकत आणून ख्रिसमस साजरा करणार.
- रॉईस फ्रेड, ग्राहक

केकच्या किमती
रस मलई - एक किलो- ९८० रुपये
चॉकलेट ग्लोरी केक - दीड किलो- १,१७० रुपये
न्यूट्रला केक- एक किलो- ८९० रुपये

होम बेकर्स
प्लम केक ४०० ग्राम- ३०० रुपये
चोको ब्लिस ३०० ग्राम- ३०० रुपये
फ्रेस क्रीम हसल नट - ३०० ग्राम- ३०० रुपये
चॉकलेट टू किल - ३०० ग्राम- ४०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com