सीएनजी वाहनांच्या रस्त्यावर रांगा
सीएनजी वाहनांच्या रस्त्यावर रांगा
अलिबागमध्ये वाहतूक कोंडीचा वाढता त्रास
अलिबाग, ता. २४ वार्ताहर ः इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलऐवजी सीएनजी व इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यानुसार सीएनजी पंपांची संख्याही वाढविण्यात येत आहे. अलिबाग शहरात एसटी स्टँडच्या मागील बाजूस तसेच वडगाव परिसरात सीएनजी पंप सुरू करण्यात आले आहेत. मात्र, एसटी स्टँडच्या मागील बाजूस असलेला सीएनजी पंप आकाराने लहान आणि अपुरी जागा असल्याने येथे येणाऱ्या वाहनांच्या रांगा अनेकदा थेट रस्त्यावर येतात. परिणामी परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असून, नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
वाढत्या महागाईच्या काळात इंधन खर्च कमी करण्यासाठी इको, रिक्षा, खासगी चारचाकी वाहनचालक मोठ्या प्रमाणावर सीएनजीचा वापर करीत आहेत. अलिबाग तालुक्यात केवळ दोनच सीएनजी पंप उपलब्ध असल्याने आधीपासूनच वाहनचालकांची गैरसोय होत होती. ही अडचण लक्षात घेऊन शहरात नवीन सीएनजी पंप उभारण्यात आला असला, तरी या पंपाजवळील जागा अपुरी ठरत आहे. पंप परिसरातील रस्ता अरुंद असून, रस्त्याच्या कडेला फळे-भाजी विक्रेते बसलेले असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा आणखी कमी होते. त्यातच सीएनजी भरण्यासाठी उभ्या राहणाऱ्या चारचाकी वाहनांच्या रांगा वाढल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याचा फटका स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच एसटी बससेवेलाही बसत आहे. वाहतूक पोलिसांकडून तात्पुरती व्यवस्था केली जात असली, तरी कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पंप परिसरात स्वतंत्र रांगेची व्यवस्था, वेळापत्रक नियोजन, तसेच अतिक्रमण हटविणे यांसारख्या ठोस उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
................
पर्यटकांकडून बेशिस्त वाहतूक
सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. अपरिचित रस्त्यांमुळे काही चालक बेदरकार वाहन चालवितात, तसेच अवैधरीत्या पार्किंग करतात. यामुळे आधीच कोंडीत अडलेल्या रस्त्यांवर वाहतूक समस्या तीव्र वाढत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

