सहा महिन्यांत चोरट्याला शिक्षा

सहा महिन्यांत चोरट्याला शिक्षा

Published on

ठाणे शहर, ता. २४ (बातमीदार) : कोपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीचा अवघ्या सहा महिन्यांत ठाणे न्यायालयामध्ये निकाल लागला. मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी चोरट्याला तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी (ता. २३) सुनावली. आरोपीचे नाव अमित प्रदीप जगताप असे असून, त्याने एका घरातून दागिने आणि मोबाईलची चोरी केली होती.

ठाणे पूर्वेतील चेंदणी, कोळीवाडा येथील हिमालया अपार्टमेंटमधील एका बंद घरातून २४ जून रोजी २६ हजारांचे दागिने, मोबाईल आणि सहा हजारांची रोकड चोरी केली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार रवींद्रकुमार पानसरे यांनी संशयिताचा शोध घेऊन त्याला अटक केली होती. तपास करून दोषारोपपत्र सुनावणीसाठी न्यायालयात दाखल केले होते. मुख्य न्याय दंडाधिकारी कुलकर्णी यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली असता चोरीच्या गुन्ह्यात दोषी ठरवून त्याला सश्रम कारावास आणि आर्थिक दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. अवघ्या सहा महिन्यांत लागलेल्या या निकालाची ठाण्यात चांगली चर्चा सुरू आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com