ठाणे कारागृहाची नाताळ उत्पादने, नऊ लाखांचे उत्पन्न
बंद्यांनी बनवलेल्या केकला मोठी पसंती
ठाणे कारागृहात नाताळात नऊ लाखांचे उत्पन्न
ठाणे, ता. २४ (बातमीदार) : नाताळ सणाचे औचित्य साधून ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांनी तयार केलेल्या केक आणि बेकरी उत्पादनांना यंदा प्रचंड प्रतिसाद लाभला. केवळ सात दिवसांत कारागृहाच्या बेकरी विभागाने विविध उत्पादनांच्या माध्यमातून नऊ लाख पाच हजार ४८७ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे.
कारागृहातून बाहेर पडल्यावर कैद्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, या उद्देशाने ठाणे मध्यवर्ती कारागृहात कारखाना विभाग चालवला जातो. यंदा नाताळसाठी येथील बंदी रात्रंदिवस केक बनवण्याच्या कामात गुंतले होते. त्यांनी तयार केलेले हे पदार्थ चविष्ट आणि किफायतशीर असल्याने ठाण्यासह मुंबई, तळोजा, भायखळा आणि कल्याण येथील कारागृहांकडून मोठी मागणी आली होती. सर्वाधिक मागणी कप केकला राहिली. सुमारे २९ हजार २७९ नग कप केकच्या विक्रीतून चार लाख ३९ हजार १८५ रुपयांची कमाई झाली. तर २ हजार ५०७ किलो स्पंज केकची विक्री झाली असून, त्यातून चार लाख ६६ हजार ३०२ रुपयांचे उत्पन्न मिळाले. कप केक केवळ १५ रुपयांत, तर अर्धा किलो स्पंज केक १८६ रुपयांत उपलब्ध करून देण्यात आला होता.
कैद्यांमधील उपजत कलाकौशल्याला संधी दिल्यास ते उत्तम निर्मिती करू शकतात, हे या यशस्वी उत्पन्नावरून सिद्ध झाले आहे. या उपक्रमामुळे त्यांच्या पुनर्वसनाला मोठी मदत होत आहे, अशी माहिती ठाणे कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
-------------
इतर संस्थांकडूनही मागणी
केवळ कारागृहेच नव्हे, तर सेंटर फॉर पीस ट्रस्ट, होम ऑफ फेथ आणि फेलोशिप ऑफ लव्ह यांसारख्या सामाजिक संस्थांनीही कारागृहातील उत्पादनांना पसंती दिली. बंद्यांच्या श्रमातून तयार झालेली ही उत्पादने गुणवत्तेच्या बाबतीतही सरस ठरल्याने यंदा उत्पन्नात मोठी भर पडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

