‘फ्लो डाईन क्रूझ’ची पर्यटकांना भुरळ

‘फ्लो डाईन क्रूझ’ची पर्यटकांना भुरळ

Published on

‘फ्लोडाईन क्रूझ’ची पर्यटकांना भुरळ
समुद्रसफर, फ्लेमिंगो दर्शनाचा आनंद; आगाऊ बुकिंगला प्रचंड प्रतिसाद
नवी मुंबई : नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बेलापूर जेट्टी येथील ‘फ्लोडाईन क्रूझ’ पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. मावळता सूर्य, समुद्रसफर, फ्लेमिंगोसह अन्य पक्ष्यांचे दर्शन आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद यांचा संगम पर्यटकांच्या पसंतीस उतरला असून, नाताळ सेलिब्रेशनसाठी आगाऊ बुकिंगला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
२५ ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी दररोज सरासरी ७० ते ८० बुकिंग होत असून, आतापर्यंत ४५० हून अधिक बुकिंग प्राप्त झाल्याची माहिती फ्लोडाईन क्रूझ व्यवस्थापनाने दिली. यामध्ये ग्रुप बुकिंगला सर्वाधिक पसंती दिली जात आहे.
डिसेंबर २०२२मध्ये महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून बेलापूर जेट्टीवर या क्रूझ सेवेची सुरुवात करण्यात आली. गोव्याच्या क्रूझ सफारीचा अनुभव आता नवी मुंबईसारख्या स्मार्ट शहरात गेल्या दोन वर्षांपासून पर्यटक घेत आहेत. सोमवार ते शुक्रवार प्रति व्यक्ती १,१०० रुपये, तर शनिवार-रविवार १,३०० रुपये दर आकारला जातो. याशिवाय सहा ते सात तास क्रूझवर थांबण्यासाठी उपलब्ध खोल्यांसाठी तीन हजार रुपये शुल्क आहे.
या क्रूझद्वारे बेलापूर जेट्टीपासून सुमारे सात किमी खोल समुद्रात फेरफटका मारण्यात येतो. यामध्ये मावळत्या सूर्याचे मनमोहक दृश्य, सीगल, फ्लेमिंगो आणि इतर पक्ष्यांचे जवळून दर्शन घेता येते. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रवाशांना सेफ्टी जॅकेट देण्यात येतात.
क्रूझच्या डेकवर डायनिंग टेबल, व्ह्यू पॉइंटसह विविध सुविधा उपलब्ध असून, आठवड्याच्या दिवशी एक फेरी तर शनिवार-रविवारी दोन फेऱ्या घेतल्या जातात. प्रत्येक फेरीत साधारण १०० ते १२० पर्यटक सहभागी होत आहेत.

नाताळ व नववर्षासाठी विशेष नियोजन
नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष सजावट, संगीत आणि सेलिब्रेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. वाढदिवस, अ‍ॅनिव्हर्सरी, गेट टुगेदर यांसाठीही क्रूझवर सुविधा उपलब्ध आहेत. ३१ डिसेंबरला मध्यरात्रीपर्यंत अतिरिक्त वेळ देऊन न्यू इयर सेलिब्रेशन करण्याचे नियोजन असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.
फ्लोडाईन क्रूझचे प्रमुख राजेश नायर म्हणाले, की साधारण दिवसांत प्रतिदिन ३० ते ४० बुकिंग असतात. मात्र सध्या नाताळ सेलिब्रेशनसाठी प्रतिदिन ७० ते ८० बुकिंग मिळत आहेत. ग्रुप सेलिब्रेशनसाठी मोठी मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com