‘कॅट’ परीक्षेचा निकाल जाहीर

‘कॅट’ परीक्षेचा निकाल जाहीर

Published on

‘कॅट’ परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई, ता. २४ : देशातील विविध आयआयएममधील एमबीए, पीजीडीएम आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) कोझिकोड यांच्याकडून घेण्यात आलेल्या कॉमन ॲडमिशन टेस्ट (कॅट) २०२५चे निकाल जाहीर केले आहेत.

कॅटच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत १०० पर्सेंटाइल मिळवणाऱ्या टॉपर विद्यार्थ्यांच्या संख्येत थोडी घट झाली असली, तरी अव्वल आयआयएम संस्थांसाठी विभागनिहाय कट-ऑफ अद्यापही ८० ते ९५ पर्सेंटाइलदरम्यान कायम आहे. या परीक्षेत एमबीए इच्छुकांपैकी १२ उमेदवारांनी १०० टक्के पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एका उमेदवाराचा समावेश आहे. यानंतर ९९.९९ पर्सेंटाईल एकूण २६ उमेदवारांनी मिळवले असून, यात राज्यातील चार उमेदवारांचा, तर ९९.९८ पर्सेंटाईल मिळवणाऱ्या एकूण २६ उमेदवारांपैकी राज्यातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. आयआयएम कोझिकोडतर्फे कॅट-२०२५ ही देशभरातील १७० शहरांमधील ३३९ परीक्षा केंद्रांवर तीन सत्रांमध्ये परीक्षा ३० नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती. यंदा या परीक्षेला नोंदणी केलेल्या २.९५ लाख उमेदवारांपैकी २.५८ लाख उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यापैकी ०.९७ लाख महिला, १.६१ लाख पुरुष, तर नऊ ट्रान्सजेंडर उमेदवार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com