रेस्टॉरंट, हॉटेल्स, खाद्य आस्थापना रडारवर

रेस्टॉरंट, हॉटेल्स, खाद्य आस्थापना रडारवर

Published on

रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्य आस्थापना रडारवर
अन्न व औषध प्रशासन विभागाची मोहीम; नववर्ष स्‍वागताची तयारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : ख्रिसमस सेलिब्रेशननंतर लगेच नववर्ष स्‍वागताची तयारी केली जात आहे. बहुतांश मुंबईकर हाॅटेल, रेस्टॉरंट क्लबमध्ये चमचमीत पदार्थांवर ताव मारतात. दरम्यान, ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ दिल्याचे निदर्शनास येताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाने दिला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील रेस्टॉरंट, हॉटेल आणि खाद्य आस्थापनांची सखोल तपासणी करतील, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.
या दिवशी अन्नपदार्थांच्या मागणीत वाढ होत असून ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ दिले जाऊ नये, यासाठी एफडीएच्या टीम मुंबईभर तपासणी करणार आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेलमधील स्वच्छतेला विशेष महत्त्व असून, यासंदर्भात हॉटेल व्यावसायिकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करावे. तपासणीदरम्यान मुदतबाह्य कच्च्या मालाचा वापर, अन्नपदार्थांमध्ये खाद्य व अखाद्य रंगांचा वापर तसेच स्वच्छतेच्या निकषांचे पालन होत आहे की नाही, याची काटेकोर तपासणी केली जाईल. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर मोठी मोहीम हाती घेतली असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

स्वागत नववर्षाचं, संकल्प हॉटेल स्वच्छतेचा
उत्तम स्वच्छता व अन्नसुरक्षा मानकांचे पालन करणाऱ्या हॉटेल आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा व राज्य स्तरावर उत्कृष्ट हॉटेलना पुरस्कार देण्यात येणार आहेत. जिल्हा स्तरावरील पुरस्कार २६ जानेवारी २०२६ला संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील, तर राज्य स्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या हॉटेलचा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

१५ जानेवारीपर्यंत विशेष मोहीम
मंत्री झिरवाळ यांच्या संकल्पनेतून ‘स्वागत नववर्षाचं, संकल्प हॉटेल स्वच्छतेचा’ हा विशेष उपक्रम २६ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा सविस्तर अहवाल मंत्री कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com