तळीरामांनी जिल्ह्यात १५.६८ कोटी लिटर मद्य रिचवले
तळीरामांनी रिचवली १५.६८ कोटी लिटर मद्य
देशी आणि बिअरला पसंती
ठाणे शहर, ता. २८ (बातमीदार) ः ऋतू कोणताही असो, सुख किंवा दुःख असो तळीरामांना तर मद्य पिण्याचे निमित्तच हवे असते. यातूनच ठाणे जिल्ह्यात मद्यपींनी अवघ्या २१ महिन्यांत १५ कोटी ६८ लाख ३८ हजार लिटर मद्याची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्यातील मद्यपींनी विदेशीला मागे सारत देशी, बियर आणि वाईनकडे मोर्चा वळवल्याचे दिसते आहे. त्यामुळे विदेशी मद्याच्या विक्रीत सात टक्क्यांची घट तर देशी, बियर आणि वाईनच्या विक्रीत अनुक्रमे १०, १८ आणि १४ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
बाजारात शासनमान्य मद्याचीच विक्री केली जावी यासाठी राज्य उत्पादन विभाग सतत सतर्क असतो. शासनाचा कर बुडविण्याच्या हेतूने केल्या जाणाऱ्या अनधिकृत मद्य वाहतूकीवर देखील हा विभाग लक्ष ठेऊन असतो. ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या नेतृत्वाखाली विभागवार भरारी पथके अनधिकृत मद्य वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाया करत आहेत. नऊ महिन्यांत कोट्यावधीच्या अवैध मद्य वाहतुकीला चाप बसविण्याचे काम केले आहे. रसायनमिश्रित दारूचे गुत्ते, भट्ट्या उध्वस्त केल्या आहेत. अनेकांवर अटकेची आणि संघटित गुन्हेगारीची कारवाई केली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणाले आहेत. परिणामी उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शासनमान्य मद्यविक्रीत वाढ झाली असून अवघ्या २१ महिन्यांमध्ये १५ कोटी ६८ लाख ३८ हजार ४२८ लिटर मद्याची विक्री झाली आहे. यातून शासनाला मोठा महसूल मिळाला आहे.
विक्री एकूण (२१ महिने) : १५, ६८, ३८, ४२८ लिटर
मद्य २०२४ २०२५
देशी १, ५९, ३८,१३० १, ७४, ८६, ५००
विदेशी मद्य २, १३, ९८, ०६५ १, ९९, १७, ७६२
बियर ३, ७०, ३४, १५० ४, ३५, ८८, ८३५
वाईन ६, ९०, ५४९ ७, ८४, ४३७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

