नवी मुंबईतील निवडणूक कार्यालयांची आयुक्तांकडून पाहणी

नवी मुंबईतील निवडणूक कार्यालयांची आयुक्तांकडून पाहणी
Published on

वाशी, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकरिता आठही विभागांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये कार्यान्वित झाली आहेत. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी शनिवारी (ता. २७) सर्व कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देत निवडणूकविषयक बाबींची व सुविधांची पाहणी केली व मोलाच्या सूचना केल्या. तसेच त्याठिकाणी आणखी आवश्यक असणाऱ्या सुविधांची तत्पर पूर्तता करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड उपस्थित होते.

बेलापूर विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून पाहणीला सुरुवात करीत संपूर्ण दिवसभर आयुक्तांनी दिघा विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत आठही कार्यालयांना भेटी देत पाहणी केली. यामध्ये प्रत्येक विभागातील प्रभागनिहाय मतदान केंद्रांचा आढावा घेताना, त्याठिकाणी पुरेशा प्रमाणात क्षेत्रीय अधिकारी उपलब्ध असल्याबाबत त्यांनी खातरजमा केली. त्याचप्रमाणे आवश्यक क्षेत्रीय अधिकारी तत्परतेने पुरवावेत, असेही निर्देश मनुष्यबळ व्यवस्थापन करणाऱ्या नोडल अधिकारी यांना दिले. आठही विभागात आचारसंहिता उल्लंघनावर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके, स्थिर पथके, व्हिडिओ देखरेख पथके कार्यान्वित झाली असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार वाढ करण्याची सूचना आयुक्तांनी केली.

आतापासूनच नियोजन करावे
२८ प्रभागांमध्ये एकूण एक हजार १४८ मतदान केंद्रे असून त्याठिकाणी आवश्यक असलेल्या सुविधा व व्यवस्थेचा आयुक्तांनी बाबनिहाय आढावा घेतला. ज्या शाळांमध्ये मोठ्या संख्येने मतदान केंद्रे आहेत, अशा ठिकाणी मतदारांची गैरसोय होणार नाही, याची काळजी आतापासूनच घेऊन त्यानुसार नियोजन करावे, असेही स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.

नवी मुंबई शहरातील आठही विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयांतील कामकाजाची पाहणी करीत व त्यांना मौलिक दिल्या. महापालिकेची निवडणूक सुव्यवस्थितपणे व पारदर्शक रितीने पार पाडण्यासाठी प्रत्येक संबधित घटकाने कर्तव्य भावनेने काम करावे.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई पालिका

विभाग प्रभाग मतदान केंद्रे
बेलापूर चार १५८
नेरुळ चार १८०
वाशी तीन १२५
तुर्भे चार १५९
कोपरखैरणे चार १६०
घणसोली तीन ११०
ऐरोली तीन १२१
दिघा तीन १३५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com