मुंबई
वसई पर्सनालिटी ब्रम्हेश सावंत तर मिस वसई पर्सनालिटी पूर्वा जावळे
ब्रम्हेश सावंत ''मिस्टर वसई'', तर पूर्वा जावळे ''मिस वसई''
विरार, ता. २९ (बातमीदार) : ३६ व्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवात ''मिस्टर आणि मिस पर्सनॅलिटी'' स्पर्धा उत्साहात पार पडली. यात ब्रम्हेश सावंतने ''मिस्टर'' तर पूर्वा जावळेने ''मिस वसई पर्सनॅलिटी''चा किताब पटकावला. ग्रुप फॅशन शोमध्ये ''अल्टीमेट परिक्रमा'' संघाने प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पराग शहाणे, गुरुनाथ बडेकर, राजेश इंदुलकर, पंकज वगळ, चंदा वनमाळी व हरिता नायर यांनी काम पाहिले.

