सुरेख वाद्यमेळ, तयारीच्या गायकीने रसिक तृप्त

सुरेख वाद्यमेळ, तयारीच्या गायकीने रसिक तृप्त

Published on

सुरेख वाद्यमेळ अन् गायकीने रसिक तृप्त
बहारदार गीतांच्या रसरशीत सादरीकरणाने रसिकांना श्रवणानंदाची मेजवानी
कल्याण, ता. २९ (वार्ताहर) : दृष्टीहीन गायक शफाक जाफरी यांनी सादर केलेली तेरी आँखोके सिवा दुनिया मे रखा क्या है, चुरा लिया है, छुप गए सारे नजारे, कितना प्यारा वादा है, डफली वाले ही एकाहून एक सरस गाणी, जुगल किशोर, जय कुमार, सी एम जोशी, प्राजक्ता चौबळ, अरुणा हेगडे आदी गायकांनी गायिलेल्या सुरेल गीतांनी रसिक प्रेक्षकांना तृप्त केले.
ज्येष्ठ दिवंगत गायक मोहम्मद रफी यांच्या १०१ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून विष्णुदास भावे नाट्यगृहात पद्मावती एन्टरटेन्मेटच्या वतीने ‘दिवाना मुझसा नही’ या मोहम्मद रफींच्या गीतांचा समावेश असलेल्या रंगारंग कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ मानल्या जाणाऱ्या कालखंडातील एकाहून एक सरस युगुल गीते, एकल गीते, कव्वाली यावेळी रसिकांना ऐकायला मिळाली. वाद्यवृंदांचे युग काहीसे लोप पावत चाललेल्या सद्यस्थितीत या गाण्यांचे बहारदार आणि रससशीत सादरीकरणाने रसिक सुखावून गेले. यावेळी दृष्टीहीन गायक शफाक जाफरी यांना आर्थिक मदतीचे आवाहन आयोजक प्रदीप नायर यांनी केले असता त्यास गीतरसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. विशाल सपकाळ यांच्या संगीत संयोजनाची उत्तम साथ गाण्यांना लाभल्याने कार्यक्रमास आणखी रंगत भरल्याचे मत गानरसिकांनी व्यक्त केले. लवकरच नवी मुंबई व पनवेल येथे आणखी प्रयोग करणार असल्याचे नायर यांनी यावेळी घोषित केले.

Marathi News Esakal
www.esakal.com