कल्याण  पश्चिमेत भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश

कल्याण पश्चिमेत भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश

Published on

कल्याण पश्चिमेत भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश
युती नको, मैत्रीपूर्वक लढू द्या ः भाजपा कार्यकर्त्यांची मागणी
कल्याण, ता. २९ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या महायुतीत झालेल्या जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील असंतोष उफाळून येताना दिसत आहे. रवींद्र चव्हाण यांच्या मनधरणीनंतरही कल्याण पश्चिमेत भाजपला फक्त ९ जागा दिल्याने भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माजी नगरसेवक रस्त्यावर उतरले असून ‘युती नको’ अशा जोरदार घोषणा दिल्या जात आहेत. पालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची असून त्यांच्यावर अन्याय सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला आहे.
युती होऊ नये ही कार्यकर्त्यांची भावना आहे. लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पाडण्याचं काम शिवसेनेने केले. युतीत आमदार झाल्यावर भाजपा कार्यालयावर हल्ला करत, कार्यकर्त्यांना मारझोड केली. अनेक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे शिवसेनेसोबत काम करण्यासाठी भाजपाचा एकही कार्यकर्ता तयार नसल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले. कल्याण पश्चिमेतील ३८ जागांपैकी केवळ नऊ जागा या भाजपाला देण्यात आल्या आहेत. मात्र आम्ही ३८ जागा लढून या सर्व जागा जिंकणार एवढी ताकद भाजपाची आहे. त्यामुळे कल्याण पश्चिममध्ये आम्हाला मैत्रीपूर्ण लढत करण्याची परवानगी वरिष्ठ नेत्यांनी देण्याची मागणी यावेळी पवार यांनी केली. युती झाल्याने गेली १० वर्षे जे जे कार्यकर्ते प्रभागात भाजपाचे काम करत आले आहेत त्यांच्यावर अन्याय होणार असून इतर नगरपालिकांप्रमाणे मैत्रीपूर्ण लढत करावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे माजी नगरसेवक अर्जुन भोईर यांनी सांगितले.
तर, कल्याण पश्चिमेत भाजपाला मानणारा वर्ग मोठा असल्याने पक्षाने आम्हाला मैत्रीपूर्ण लढण्याची परवानगी द्यावी अन्यथा स्वबळावर लढण्यासाठी भाजपा कार्यकर्ता सक्षम असल्याची प्रतिक्रिया भाजपाच्या महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रीती दीक्षित यांनी दिली.
आज भाजपाजे चांगले दिवस आले आहेत ते कार्यकर्त्यांमुळे आहेत. हे पक्षातील नेते, मंत्री यांनी लक्षात ठेवावे. मात्र, दुधातून माशी काढतात तसे कार्यकर्त्यांना बाजूला काढलं जात आहे, अशी प्रतिक्रिया भाजप शहर सरचिटणीस साधना गायकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com