वालधुनी पुल वाहतुकीसाठी खुला; आठवड्याभरात दुरुस्ती पूर्ण
कल्याणकरांना मोठा दिलासा
वालधुनी पुलाचे काम आठ दिवसांत पूर्ण ः वाहतुकीसाठी खुला
कल्याण, ता. २९ (बातमीदार) : महानगरपालिका प्रशासनाने वालधुनी पुलाची दुरुस्ती वेळेपूर्वीच पूर्ण केली आहे. शनिवार (ता. २०) पासून पुलावरील दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले होते. हे काम १० जानेवारीपर्यंत केले जाणार होते, परंतु निवडणुकीचा काळ लक्षात घेता दुरुस्तीचे हे काम केवळ आठ दिवसांत पूर्ण करण्यात आले. सोमवार (ता.२९)पासून हा पूल वाहनचालकांसाठी खुला केला आहे. पालिकेच्या जलद कार्यक्षमतेचे नागरिकांकडून केले जात आहे.
वालधुनी पूल कल्याण आणि उल्हासनगर शहरांना जोडणारा महत्त्वाचा वाहतूक दुवा असल्याने काही दिवसांपूर्वीच्या दुरुस्तीमुळे या मार्गावरील रहदारीवर मोठा परिणाम झाला होता. पुलावरील तडे, खड्डे व गंजलेल्या बेरिंग आणि गर्डरमुळे सुरक्षेच्या दृष्टीने दुरुस्तीकरिता वाहतूक बंद करण्यात आली होती, मात्र पालिका अभियंता विभाग आणि कंत्राटदारांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे केवळ आठ दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण करून पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलाची तपासणी पूर्ण झाली असून आता नागरिक निश्चिंतपणे या मार्गाचा वापर करू शकतात. स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, वाहतूक कोंडी आणि वेळेचा अपव्यय कमी होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.
या रेल्वे उड्डाणपुलावर कंत्राटी कंपनीने जादा उपकरणे व मनुष्यबळ वापरून दिवस-रात्र काम सुरू ठेवून वेळेपूर्वीच आठ दिवसांत पुलाच्या दुरुस्तीचे काम केले आहे. ही दुरुस्ती करताना सर्वप्रथम डांबराचा जुना थर अगोदर पूर्णपणे हटविण्यात आला. त्यामुळे पुलावरील अनावश्यक भार लक्षणीय प्रमाणात कमी झाला आहे. तसेच नवा रस्ता बनवताना डांबरी मास्टिकचा वापर करण्यात आला आहे, यामुळे पुलाच्या पृष्ठभागाचा टिकाऊपणा वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाच वर्षांची गॅरंटी
दुरुस्ती केलेल्या पुलाचे काम गुणवत्तापूर्ण करण्यात आले असून, या पुलावर पाच वर्षे खड्डे पडणार नाहीत, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. त्यापूर्वी कोणतीही समस्या उद्भवल्यास संपूर्ण जबाबदारी कंत्राटी कंपनीची असेल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

