भेसळ रोखण्यासाठी एफडीएची करडी नजर

भेसळ रोखण्यासाठी एफडीएची करडी नजर

Published on

भेसळ रोखण्यासाठी एफडीएची करडी नजर
नववर्षाच्या जल्लोषात निकृष्ट अन्न देणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर होणार कारवाई
वाशी, ता. २९ (बातमीदार) : थर्टी फस्ट व नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यासाठी हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाउस, चायनीज कॉर्नर तसेच विविध खाद्यगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर बुकिंग सुरू आहे. मात्र या उत्सवाच्या धामधुमीत अनेक ठिकाणी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज झाला आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न, भेसळयुक्त पदार्थ तसेच अस्वच्छतेत तयार होणारे केक व खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कोकण विभागाचे सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांनी दिला आहे.
थर्टीफस्टच्या दिवशी हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी असते. या धावपळीत अन्न अर्धवट शिजवून देणे, निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरणे, बटरऐवजी डालडाचा वापर करणे, तर काही ठिकाणी नॉनव्हेज पदार्थांमध्ये चिकन किंवा मटणऐवजी इतर मांस वापरणे, असे निदर्शनास आले आहे. स्वस्त दरात देण्याच्या स्पर्धेतही दर्जाहीन केक तयार करून विकले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यापूर्वी वाशी रेल्वे स्थानक परिसरात शौचालयात पाणीपुरीचे साहित्य साठवले जाणे, ऐरोलीमध्ये शौचालयातील पाण्याचा वापर खाद्यपदार्थांसाठी होणे, तसेच ठाण्यातील हॉटेलमध्ये अत्यंत अस्वच्छ प्रकार उघडकीस येणे अशा घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्‍यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, केक विक्रेते, रेस्टॉरंट व खाद्यगाड्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
......................
प्रशासनाकडून सक्‍त सूचना
थर्टी फस्टच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने दहा दिवसांपूर्वीच हॉटेल व्यावसायिकांना सूचना दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांना त्वचारोग आहे की नाही, पिण्याचे पाणी स्वच्छ आहे का, स्वयंपाकघरातील स्वच्छता, कीडनाशक नियंत्रण (पेस्ट कंट्रोल) आदी बाबींचे पालन बंधनकारक आहे. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन (कोकण विभाग)वे सहआयुक्‍त श्रीकांत करकाळे यांनी सांगितले. तर उघड्यावर विकले जाणारे अन्न बहुतांश वेळा अस्वच्छ पाणी, निकृष्ट कच्चा माल आणि धुळीच्या संपर्कात असते. अशा पदार्थांमध्ये पोषणमूल्य नसून ते आरोग्यास अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावरचे अन्न टाळावे, असा सल्ला जनरल फिजिशियन डॉ. प्रतीक तांबे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com