वायुगुणवत्ता सुधारण्यासाठी शहरात डीप क्लिनिंग

वायुगुणवत्ता सुधारण्यासाठी शहरात डीप क्लिनिंग

Published on

वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरात डीप क्लिनिंग
नेरूळ, ता. २९ (बातमीदार) : शहरातील वाढते वायुप्रदूषण नियंत्रणात आणून नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळावे, या उद्देशाने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने रस्त्यांचे ‘डीप क्लिनिंग’ अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशांनुसार शहरातील वाहतुकीचे मुख्य मार्ग, एमआयडीसी परिसर तसेच अंतर्गत रस्ते आणि पदपथांची सखोल स्वच्छता सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत सायन-पनवेल महामार्गासारखे वर्दळीचे रस्ते, एमआयडीसी क्षेत्रातील साउथ सेंट्रल रोड, तसेच शहराच्या विविध भागांतील अंतर्गत मुख्य रस्ते आणि पदपथांवर साचलेली माती, धूळ व कचरा यांत्रिकी पद्धतीने साफ करण्यात येत आहे. स्वच्छता केल्यानंतर रस्ते व पदपथ प्रक्रियाकृत पाण्याने धुऊन घेण्यात येत असून, त्यामुळे हवेत उडणारी धूळ कमी होऊन वायु गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होत आहे. विशेष बाब म्हणजे या मोहिमेसाठी केवळ स्वच्छता विभागच नव्हे, तर अभियांत्रिकी विभागातील अभियंतेदेखील प्रत्यक्ष क्षेत्रात उतरले आहेत. शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली यांत्रिकी साधनसामग्री व मनुष्यबळाचा समन्वय साधत वाशी ते बेलापूरदरम्यान सायन-पनवेल महामार्गावर स्वच्छता करण्यात आली. याचप्रमाणे बेलापूर ते वाशी मार्गावर उड्डाणपुलांसह संपूर्ण रस्त्याची घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सखोल स्वच्छता करण्यात आली. यासाठी तब्बल २५० हून अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. अजय गडदे, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व संबंधित पथके रस्त्यावर उतरून या मोहिमेवर देखरेख करत होते. तसेच एमआयडीसी क्षेत्रातील साउथ सेंट्रल रोडवरही अभियांत्रिकी विभागामार्फत यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com