शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी भरले अर्ज

शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी भरले अर्ज

Published on

‘वाजवा तुतारी, गाडा गद्दारी’
कळव्यात आव्हाडांच्या उपस्थितीत शरद पवार गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन
कळवा, ता. २९ (बातमीदार) ः कळवा परिसरात शरद पवार पक्षाने सोमवारी (ता. २९) जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक २३ आणि २५ मधील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. वाजवा तुतारी, गाडा गद्दारी असा नारा देत आव्हाडांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले.
जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, ठाणे महिलाध्यक्ष सुजाता घाग यांच्यासह प्रभाग क्रमांक २५ मधील उमेदवार प्रकाश बर्डे, वर्षा मोरे यांनी कळवा पूर्व येथून रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, प्रभाग क्रमांक २३ मधून प्रकाश पाटील आणि दिपा गावंड यांची रॅली निघाली. या दोन्ही रॅलींमध्ये डाॅ. जितेंद्र आव्हाड हे सहभागी झाले होते.
याप्रसंगी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अर्ज दाखल करताना उसळलेला जनसमुदाय पाहता, लोकांना विकास हवा आहे, हेच स्पष्ट होत आहे. कळव्यातील मतदार हे विकासाला मतदान करणार असल्याचे दिसत आहे. कळवा पूर्वेतील झोपड्यांवर जेव्हा कारवाई करण्यात येणार होती, तेव्हा आपणच चार तास रेल रोको करून झोपड्या वाचविल्या होत्या. येथील पाण्याची, विजेची समस्या मार्गी लागली आहे. अगदी डोंगरपट्ट्यातील गल्ल्यादेखील काँक्रीटच्या केल्या आहेत. वाहतूक कोंडीची थोडीफार समस्या असली तरी लवकरच नवे रस्ते तयार करून ती समस्याही मार्गी लावण्यात येणार आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आपले खासदार हुशार आहेत. ते डाॅक्टर आहेत, पण ते सांगतात की घरगुती गॅसची वाहिनी अंबरनाथमधून आली आहे, पण ही वाहिनी ठाण्यातून आली आहे. आपणच तिचे स्वागत केले होते. ही वाहिनी अंबरनाथमधून आली असती, तर कळव्यात आधी घरगुती गॅसपुरवठा झाला नसता, अशी टीका त्यांनी नाव न घेता श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com