उल्हासनगरमध्ये महायुती कोसळली
उल्हासनगरमध्ये महायुतीत दुरावा
शिवसेनेने युतीधर्म पाळला नाही; भाजप ७८ जागांवर लढणार
उल्हासनगर, ता. २९ (वार्ताहर) : महायुतीच्या चर्चेत अडकलेले राजकीय गणित अचानक कोलमडले असून, उल्हासनगरमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी केली आहे. ‘शिवसेनेने युतीधर्म पाळला नाही,’ असा थेट आरोप करत वधारिया यांनी महायुतीत फुटीवर शिक्कामोर्तब केल्याने उल्हासनगरचे राजकारण पूर्णपणे नव्या वळणावर आले आहे.
वधारिया यांनी सांगितले की, आगामी महापालिका निवडणुकीत भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेने युतीधर्म पाळला नाही, तसेच महायुतीत अपेक्षित समन्वय साधला गेला नाही, तसेच जागावाटप आणि निर्णय प्रक्रियेत भाजपला विश्वासात घेण्यात आले नाही.’ युती म्हणजे केवळ घोषणाच नव्हे, तर परस्पर सन्मान आणि संवाद आवश्यक असतो. तो झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. महायुतीबाबत अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला असून, भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यासोबतच भाजप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत चर्चा करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे भाजप नव्या सामाजिक व राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. उल्हासनगर महापालिका निवडणूक आता केवळ सत्ताबदलापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर भविष्यातील शहराच्या राजकीय दिशेचा फैसला करणारी निर्णायक लढाई ठरत आहे.
‘दोस्तीचे गठबंधन’ कायम
दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट), टीम ओमी कलानी आणि साई पक्ष यांचे स्थानिक पातळीवरील ‘दोस्तीचे गठबंधन’ कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात असून, भाजपविरोधात स्वतंत्र आणि मजबूत आघाडी उभारण्याची तयारी सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

