खोपोलीत काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च

खोपोलीत काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च

Published on

खोपोलीत काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च

खालापूर, ता. २९ (बातमीदार) : शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मंगेश सदाशिव काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी (ता. २९) सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला. नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची राजकीय वैमनस्यातून शुक्रवारी (ता. २६) सकाळी ७ वाजता हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबीयांची भेट घेतली होती.

राजकीय वैमनस्यातून झालेल्या काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला. यामध्ये आमदार महेंद्र थोरवे, मंगेश काळोखे यांच्या दोन मुलींसह शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. हा मार्च काळोखे यांच्या साईबाबानगर येथील घरापासून खोपोली पोलिस स्थानकापर्यंत काढण्यात आला. या वेळी नागरिकांनी मंगेश काळोखे अमर रहेच्या घोषणा देत या घटनेचा निषेध व्यक्त केला. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहूल यांना आमदार थोरवे आणि काळोखे यांच्या दोन मुलींनी निवेदन देत हत्येची सूत्रधारासह उर्वरित आरोपींना अटक करण्याची मागणी केली. या वेळी १० आरोपींना अटक करण्यात आली असून, तपास पूर्ण करून सूत्रधारालादेखील ताब्यात घेऊ, असे आश्वासन विशाल नेहूल यांनी दिले. या वेळी तीन दंगल नियंत्रण पथक आणि जिल्ह्यातून जवळपास ११० पोलिसांचा बंदोबस्त खोपोलीत तैनात करण्यात आला होता.

Marathi News Esakal
www.esakal.com