जर्मन टेक्नॉलॉजीच्या धर्तीवर वातानुकूलित तंबू

जर्मन टेक्नॉलॉजीच्या धर्तीवर वातानुकूलित तंबू

Published on

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २९ : उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, मतमोजणीसाठी जर्मन टेक्नॉलॉजीच्या धर्तीवर भव्य वातानुकूलित तंबू उभारण्यात येत आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या संकल्पनेतून हा तंबू पवई चौकातील शासकीय इमारतीच्या प्रशस्त प्रांगणात उभारला जात आहे.
अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपायुक्त विशाखा मोटघरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या देखरेखीखाली पालिकेचे ठेकेदार आकाश चंदनानी हे तंबू उभारणीचे काम करीत आहेत. या वातानुकूलित तंबूमध्ये एकाच वेळी सुमारे ८०० जण बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने नियुक्त केलेले सहा निवडणूक निर्णय अधिकारी - बाळासाहेब तिडके, गणेश सांगळे, विशाल जाधव, विजयकुमार वाकोडे, मुकेश पाटील आणि डॉ. संजय शिंदे यांच्यासाठी स्वतंत्र वातानुकूलित कक्ष तयार करण्यात येत आहेत.
मुख्य रस्त्यालगत उभारण्यात येत असलेला हा तंबू सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. पूर्वी ताडपत्री, बांबू व साध्या संरचनेत मतमोजणीची व्यवस्था केली जात होती. मात्र यंदा प्रथमच अत्याधुनिक आणि वातानुकूलित पद्धतीने मतमोजणी होत असल्याने हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरत आहे.


कसा आहे तंबू?
हा तंबू १८० बाय १२५ फूट क्षेत्रफळात उभारण्यात येत आहे. त्याची उंची तब्बल ५५ फूट ठेवली आहे. तंबूच्या खाली संपूर्ण कार्पेट घालण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या तंबूच्या मध्यभागी एकही खांब नसणार आहे. एमएस चॅनलच्या लोखंडी संरचनेवर हा तंबू उभारण्यात येत आहे. वापरण्यात येणारा कापड जाड जीएसएम वॉटरप्रूफ स्वरूपाचा आहे. याच ठिकाणी सर्व मतमोजणीसाठी आवश्यक मशीनरी ठेवण्यात येणार आहे.

निवडणुकीत उभे असलेले सर्वपक्षीय व अपक्ष उमेदवार; तसेच त्यांच्या प्रतिनिधींना गारेगार आणि सुस्थितीत मतमोजणी पाहता यावी, यासाठी वातानुकूलित तंबूची संकल्पना राबविण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि पारदर्शक व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त

आयुक्त मनीषा आव्हाळे, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्यामुळे तंबू उभारण्याची संधी मिळाली. सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या देखरेखीखाली तंबूचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. यावरील कापड जीएसएम वॉटरप्रूफ असून, त्यावर १५ जण उभे राहिले तरी तो फाटणार नाही.
- आकाश चंदनानी, ठेकेदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com