मतमतांतरे

मतमतांतरे

Published on

मतमतांतरे
----
सर्व यंत्रणा राबाव्यात!
सध्या मुंबई परिसरात वायू प्रदूषणाने उच्चांकी पातळी गाठली आहे. उच्च न्यायालयाने कारवाईचा इशारा दिल्यावर मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह संबंधित अधिकारी खडबडून जागे झाले. हल्ली अनेक प्रकरणांत न्यायालयाने कानपिचक्या दिल्याशिवाय यंत्रणांना जागच येत नाही, हे वारंवार दिसत आहे. वास्तविक पाहता प्रदूषणविषयक नियमानुसार बांधकाम ठिकाण आच्छादित करणे, पाण्याची नियमित फवारणी करणे, नियमावलींचे योग्य पालन होते की नाही हे पाहण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देणे अपेक्षित आहे. बांधकामांव्यतिरिक्त वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरतो तो वाहनातून बाहेर पडणारा धूर. परंतु परिवहन विभागातर्फे कारवाई केल्याचे दिसत नाही. त्यामुळे केवळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच नव्हे, तर इतर यंत्रणांनीही हातभार लावणे गरजेचे आहे.
- गुरुनाथ मराठे, बोरिवली
---
टीकेकडे दुर्लक्ष हिताचे!
मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र, मराठी माणसांच्या हितासाठी ठाकरे बंधू २० वर्षांनी एकत्र आले. हे काहींना न आवडल्याने उत्तर भारतीयांचा जनाधार नसलेले नेते ठाकरे बंधूंना डिवचण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच शिवसेना, मनसे कार्यकर्त्यांची माथी भडकवण्याचा डाव आखला जात आहे. त्यातूनच एखाद्या उत्तर भारतीयास मारहाण झाली की हेच उत्तर भारतीय शिवसेना, मनसेला बदनाम करतील. मुंबईत ठाकरेंना मानणारे अनेक उत्तर भारतीय आहेत. अशावेळी शिवसेना, मनसे कार्यकर्त्यांनी संयम राखून उत्तर भारतीयांच्या टीकेकडे दुर्लक्ष करणे हिताचे आहे.
- नंदकुमार पांचाळ, घोडपदेव
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com