थर्टी फर्स्टसाठी वसईची किनारपट्टी हाऊसफुल्ल

थर्टी फर्स्टसाठी वसईची किनारपट्टी हाऊसफुल्ल

Published on

थर्टी-फर्स्टसाठी वसईची किनारपट्टी हाउसफुल्ल
पर्यटकांची निसर्गाच्या कुशीत पार्टी
विरार ता. ३० (बातमीदार) : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी वसई-विरारची समृद्ध किनारपट्टी पर्यटकांनी गजबजून गेली आहे. मुंबईच्या जवळ असलेले हे निसर्गरम्य ठिकाण एक दिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांच्या पहिल्या पसंतीस उतरत असून, यंदा नाताळ आणि नववर्षाच्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनाला मोठा बहर आला आहे.

वसई-विरारला एका बाजूला विस्तीर्ण समुद्रकिनारा, तर दुसऱ्या बाजूला नारळी-पोफळी आणि केळीच्या हिरव्यागार वाड्यांचे वरदान लाभले आहे. स्थानिक कोळी आणि आगाशी शैलीतील चविष्ट पदार्थांची रेलचेल पर्यटकांना भुरळ घालत आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि मिरा-भाईंदर या शहरांतून मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे दाखल होत आहेत. समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त वसई-विरारमधील इतर पर्यटनस्थळांवरही पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पोर्तुगीजकालीन वसईचा किल्ला आणि त्यातील वास्तुकला पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत. विरारचे सुप्रसिद्ध जीवदानी मंदिर, निसर्गाच्या सान्‍निध्यात असलेले तुंगारेश्वर महादेव मंदिर आणि नव्याने आकाराला आलेले भव्य द्वारकाधीश मंदिर भाविक व पर्यटकांनी गजबजले आहे.

दळणवळणाची सुलभता
रस्ते आणि रेल्वे मार्गाने थेट जोडलेले असल्याने कमी वेळेत आणि खिशाला परवडणाऱ्या दरात पिकनिक साजरी करण्यासाठी वसई-विरार हे हक्काचे ठिकाण बनले आहे. स्थानिक रिक्षा आणि बससेवेच्या सुलभतेमुळे ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे पर्यटकांना सोपे झाले आहे.

प्रमुख आकर्षणे
अर्नाळा ते वसईदरम्यानचा शांत समुद्रकिनारा, सुसज्ज रिसॉर्ट आणि त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले लाइव्ह कॉन्सर्ट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com