बदलापूर–कर्जत महामार्गावर वाहतूक ठप्प
बदलापूर-कर्जत महामार्गावर वाहतूक ठप्प
सिग्नल यंत्रणेनंतरही तासन्तास कोंडी
बदलापूर, ता. ३० (बातमीदार) : बदलापूर-कर्जत महामार्गावर वाहतूक कोंडीचा विळखा अधिक घट्ट झाला असून, सायंकाळच्या वेळी या मार्गावर अक्षरशः वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. प्रशासनाने बसवलेली सिग्नल यंत्रणाही या वाढत्या वाहनांच्या संख्येपुढे अपयशी ठरत असून, वाहनचालक आणि प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
कार्यालयीन सुट्टीनंतर घरी परतणारे नोकरदार आणि शालेय बसमुळे वाहतुकीचा ताण वाढतो. काही बेशिस्त वाहनचालक सिग्नलचे नियम पाळत नसल्याने चौक परिसरात गोंधळ निर्माण होतो. महामार्गावर वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. अवजड वाहने आणि स्थानिक वाहतूक एकाच वेळी आल्याने ‘बॉटलनेक’ची स्थिती निर्माण होत आहे. सिग्नल असूनही वाहतूक पोलिसांच्या अभावामुळे येथे मोठी कोंडी होते. प्रशासनाने केवळ यंत्रणा बसवून चालणार नाही, तर तिची अंमलबजावणीही केली पाहिजे. आमचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक वाहनचालक नितीन सोनावणे यांनी दिली.
चालकांच्या प्रमुख मागण्या
१. नवा उड्डाणपूल : बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा आणखी एक उड्डाणपूल तातडीने उभारावा.
२. कडक अंमलबजावणी : सिग्नल तोडणाऱ्यांवर आणि बेशिस्त चालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.
३. पोलिस बंदोबस्त : गर्दीच्या वेळी महत्त्वाच्या चौकांमध्ये अतिरिक्त वाहतूक पोलिस तैनात करावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

