सरते वर्ष स्वप्नवत

सरते वर्ष स्वप्नवत

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३० : सरते वर्ष नवी मुंबईकरांसाठी आकाशी झेपावणारे ठरले आहे. गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षेत असणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ अखेर सुरू झाले. याच वर्षात गेले सहा वर्षे रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. उलवे कोस्टल रोड, खारघर-तुर्भे लिंक रोड, बेलापूर कोस्टल रोड अशा प्रकल्पांची मुहूर्तमेढही याच वर्षात रोवली गेली.

दोन वर्षांपूर्वी मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा अटल सेतू राज्याला मिळाला, तेव्हापासून खऱ्या अर्थाने महामुंबईच्या पायाभरणीला सुरुवात झाली. आगामी दहा वर्षांत विविध प्रकल्पांमुळे नवी मुंबई आणि पनवेल या दोन महापालिकांचे रुपडे पालटणार आहे. मुंबईनंतर या दोन महापालिकांच्या हद्दीत येणारा परिसर आर्थिक विकासाचे हब होणार आहे. सरत्या वर्षात तयार झालेल्या विमानतळाच्या पूर्ततेमुळे त्या अनुषंगाने पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे. २५ डिसेंबरला नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्याने हे वर्ष नवी मुंबईकरांसाठी कायम आठवणीत राहणारे ठरणार आहे. या विमानतळामुळे गेली दोन दशकांहून अधिक काळ विमानतळाचे नाव ऐकून मोठ्या झालेल्या पिढीला प्रत्यक्षात विमानतळ पाहायला मिळाले. विमानतळामुळे आता त्याला साजेसे अशी विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प येणार आहेतच; परंतु २०२५ हे वर्ष अनेक नवे प्रकल्प सुरू करणारे राहिले आहे.

नवी मुंबई महापालिकेने वाशीच्या एनएमएमटी बस डेपोवर तयार केलेले वाणिज्य संकुल याच वर्षी सेवेत आले. सिडकोने विमानतळाकरिता गतिमान प्रवासासाठी खारघर-तुर्भे लिंक रोडचे काम याच वर्षात सुरू झाले. विमानतळाला थेट जाता यावे, याकरिता सिडकोने उलवे आणि तरघरजवळ तयार केलेले दोन गोलाकार उड्डाणपूल या सरत्या वर्षात कार्यान्वित झाले असून प्रवाशांना विनाअडथळा प्रवास मिळणार आहे.

खारघर-बेलापूर कोस्टल रोडचा प्रकल्प अहवाल याच वर्षात मंजुरी मिळाली. अटल सेतूपासून ते विमानतळाला जोडणारा उलवे कोस्टल रोड या नव्या वर्षात पूर्ण होणार होईल. एनएमएमटीला विमानतळामुळे आता नव्या मार्गाची भर पडली आहे. यानिमित्ताने एनएमएमटीला नवे प्रवासी मिळणार आहेत. उरण-बेलापूर रेल्वेमार्गावर तरघर हे नवे रेल्वे स्थानक प्रवाशांना मिळाले. त्यामुळे विमानतळाला रेल्वेची जोड मिळाली. गेल्या अनेक वर्षांपासून १४८ कोटी रुपये खर्च करून तयार केलेली नेरूळ जेट्टी अखेर १५ डिसेंबरपासून नियमित सुरू झाली. सध्या या जेट्टीवरून भाऊचा धक्का आणि घारापुरी या दोन मार्गांवर प्रवासी वाहतूक केली जात आहे.

चालू वर्षात सुरू झालेले प्रकल्प
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
- तरघर रेल्वे स्थानक
- वाशी एनएमएमटी बस डेपो
- सिडकोची नेरूळ जेट्टी
- बेलापूर येथे चार मजली पार्किंग
- विमानतळाला जोडणारे दोन उड्डाणपूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com