निकस साफ्रोनोवांचे ‘ड्रीम व्हिजन’ कला प्रदर्शन

निकस साफ्रोनोवांचे ‘ड्रीम व्हिजन’ कला प्रदर्शन

Published on

निकस साफ्रोनोवांचे ‘ड्रीम व्हिजन’ कला प्रदर्शन
भारताचा इतिहास, अध्यात्म प्रतिबिंबित

मुंबई, ता. ३० : पीपल्स आर्टिस्ट ऑफ द रशियन फेडरेशनचे निकस साफ्रोनोव यांचे ‘ड्रीम व्हिजन’ हे एकल कला प्रदर्शन मंगळवार (ता. ३०) पासून मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए), फोर्ट येथे सुरू झाले आहे. हे प्रदर्शन १५ जानेवारी २०२६ पर्यंत सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी खुले राहणार आहे. रोसनेफ्टच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन सांस्कृतिक आणि शैक्षणिक उद्देशाने सादर करण्यात येत आहे. प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
भारतीय प्रेक्षकांसाठी खास साकारण्यात आलेल्या या चित्रमालिकेत भारताचा इतिहास, अध्यात्म, पौराणिक कथा आणि स्थापत्य परंपरेबद्दल साफ्रोनोव यांचा आदरभाव प्रतिबिंबित होतो. भारताच्या सांस्कृतिक वारशाची कलात्मक मांडणी या चित्रांमधून साकारण्यात आली आहे. हे प्रदर्शन पारंपरिक कलापद्धती आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान यांच्यातील संवादावर आधारित आहे.
नवी दिल्लीतील प्रदर्शनाने मला एक विक्रम दिला, मात्र मुंबईची कलात्मक ऊर्जा वेगळी आहे. येथे कला, सिनेमा आणि सर्जनशीलतेचा सतत प्रवाह आहे. येथील प्रेक्षक अधिक परिपक्व आणि संवेदनशील आहेत, असे निकस साफ्रोनोव म्हणाले.
एनजीएमए मुंबईच्या संचालिका आयएएस निधी चौधरी म्हणाल्या, की एनजीएमए मुंबई येथे निकस साफ्रोनोव यांचे पहिले एकल प्रदर्शन सादर करताना रशियन फेडरेशनच्या दूतावासासोबत सहकार्य करण्याचा आम्हाला आनंद आहे. पारंपरिक कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव देईल.


प्रतीकात्मक मांडणी

मुंबईतील या प्रदर्शनात एनजीएमएच्या घुमटात साफ्रोनोव यांच्या कारकिर्दीतील विविध टप्प्यांचे प्रतिनिधित्व करणारी एकूण ४५ चित्रे सादर करण्यात आली आहेत. या चित्रांमध्ये पारंपरिक चित्रकला, प्रतीकात्मक मांडणी, निसर्गदृश्ये तसेच ‘ड्रीम व्हिजन’ ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण शैली पाहायला मिळते. वास्तववाद, तात्त्विक चिंतन आणि अवचेतन प्रतिमांचा संगम ही या शैलीची ओळख आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com