विक्रमगडमध्ये ''थर्टी फर्स्ट''चा फिव्हर
विक्रमगडमध्ये ‘थर्टी फर्स्ट’चा फिव्हर
विक्रमगड, ता. ३० (बातमीदार) : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी निसर्गसंपन्न विक्रमगड सज्ज झाले आहे. शहराच्या धावपळीतून शांतता शोधण्यासाठी पर्यटकांनी विक्रमगडला पहिली पसंती दिली असून, येथील सर्वच फार्महाउस आणि रिसॉर्ट्स रविवारपासूनच मुंबईकर पर्यटकांनी फुलून गेले आहेत.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा हा भाग शुद्ध हवा आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. विक्रमगड तालुक्यातील २५ ते ३० फार्महाउसमध्ये ३१ डिसेंबरसाठी आगाऊ बुकिंग पूर्ण झाले आहे. आयत्या वेळी येणाऱ्या पर्यटकांना जागा शिल्लक नसल्याचे मालकांकडून सांगण्यात येत आहे. यंदा ३१ डिसेंबर बुधवारी असला तरी पर्यटकांनी रविवारपासूनच या भागात मुक्काम ठोकला आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ग्रामीण भागातील हॉटेल आणि रिसॉर्ट्समध्ये जय्यत तयारी सुरू आहे. थर्टी फर्स्टनिमित्त मटण, चिकन आणि मासे यांच्या गावरान मेजवानीवर खवय्ये ताव मारणार आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आणि नव्या वर्षाचा संकल्प करत निसर्गरम्य वातावरणात सेलिब्रेशन रंगणार आहे.
पोलिस प्रशासन सतर्क
सेलिब्रेशनच्या नावाखाली कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. हॉटेल, रिसॉर्ट्स आणि सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी रोखण्यासाठी अतिरिक्त पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

