वंचित उमेदवारापासून ''वंचितंच''

वंचित उमेदवारापासून ''वंचितंच''

Published on

‘वंचित’ उमेदवारांपासून वंचित
१६ जागांवर उमेदवार मिळाले नाहीत; पाठिंब्याचा पेच

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबईत काँग्रेस आणि ‘वंचित’मध्ये झालेल्या आघाडीतून ६२ जागा वंचितच्या पदरात पडल्या; मात्र मोठ्या हट्टाने मागून घेतलेल्या यातील १६ जागांवर वंचितला उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे या दोन्ही पक्षांची पाटी कोरी असणार आहे. या घडामोडींमुळे युतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. या जागांवर नेमका कुणाला पाठिंबा द्यायचा, यावरूनही दोन्ही पक्षांत वाद उफाळू शकतो.
जवळपास २८ वर्षांनंतर काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीमध्ये युती झाली. जागावाटपात वंचितला सुटलेल्या ६२ जागांमध्ये कुठलेही बदल होणार नाहीत, असे हमीपत्र वंचितने लिहून घेतले. प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी यातील जवळपास २१ जागांवर वंचितला उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या जागांवर इच्छुक उमेदवार आहेत का, असा निरोप वंचितकडून धाडण्यात आला. काँग्रेसने या जागांवर उमेदवारांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला; मात्र वेळेच्या कमतरेमुळे ते शक्य झाले नाही. पाच उमेदवार उभे करण्यात वंचितला यश मिळाले; मात्र १६ जगांवर दोन्ही पक्षांचे निवडणूक चिन्ह गायब झाले आहे.
...
पाठिंब्याचा पेच
रिक्त राहिलेल्या या बहुतांश जागा दक्षिण मुंबईतील माहीम, दादर, शिवडी, चेंबूर, परळ, माझगाव, नायगाव, डॉकयार्ड या भागांतील आहेत. यामध्ये काही जागांवर ठाकरे तर काही जागांवर मनसेचे उमेदवार आहेत. या जागांवर नेमका कुणाला पाठिंबा द्यायचा, हा प्रश्न उपस्थित होणार आहे. ठाकरेंच्या उमेदवारांना पाठिंबा देणार नाही, अपक्षांना पुरस्कृत करू, असे वंचितचे म्हणणे आहे. यावरूनही नवा संघर्ष उभा राहू शकतो.
...
काँग्रेसकडे उमेदवारांची वानवा
काँग्रेसला काही जागांवर उमेदवार मिळाले नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या काही उमेदवारांनी अर्ज भरला नाही. त्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. ऐनवेळी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे त्यातील अनेक अर्ज बाद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
...
मिठाचा घडा
वंचितला या जागांवर उमेदवार नव्हते तर या जागा मागितल्या का, असा प्रश्न काँग्रेस नेत्यांनी केला. वंचितला मानणारा मतदार आहे; मात्र सक्षम उमेदवारांची कमतरता आहे. या घडामोडीमुळे एकमेकांबद्दल अविश्वासाचे वातावरण तयार होऊ शकते, असेही या नेत्यांनी सांगितले.
...
पक्षाला १६ जागांवर योग्य उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे या जागा आम्ही काँग्रेसला परत केल्या. या जागांवर कुणाला पाठिंबा द्यायचा हे दोन्ही पक्ष मिळून ठरवू.
- सिद्धार्थ मोकळे, प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी
...
काही जागांचा अपवाद वगळता आम्ही सर्वच ठिकाणी उमेदवार दिले आहेत. वंचितने काही ठिकाणी उमेदवार का दिले नाहीत, याबद्दल मला कल्पना नाही.
- वर्षा गायकवाड, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com